देशाचे तुकडे करण्याचा जे प्रयत्न करतील, त्यांचेच तुकडे होतील – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई । झुंजार न्यूज
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचे संविधान लिहुन देशाची एकता आणि लोकशाही मजबुत केली आहे.देशातर्गत छोटे-मोठे भांडणे होतात.मात्र या देशात काणी फुट पाडु शकत नाही.या देशाचे तुकडे करण्याच जो काणी विचार करेल त्याचेच तुकडे होतील.देशाचे संविधान मजबुत असल्यामुळे देशाची एकता,अखंडता,लोकशाही मजबुत राहणार आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्य मंत्री पदाची हॅट्रीक मारल्यानंतर त्यांचा पहिला जाहिर सत्कार करण्याची संधी नाशिककरांना मिळाली.रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वात नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे तिसऱ्यांदा केंद्रिय राज्यमंत्री झाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांचा नाशिक मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने ,आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि नाशिक च्या सर्व नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी नाशिक चे पालक मंत्री दादा भुसे आणि आमदार सीमाताई हिरे रिपब्लिकन चे ज्येष्ठ नेते रमेश मकासरे , अंकुशभैया भैलुमें , भूषणभाई लोंढे, दीक्षाताई लोंढे, विश्वनाथ काळे , चंद्रशेखर कांबळे, पागरे, विनोद जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
.
—
