पुणे l झुंजार न्यूज
रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधुन गोमय रक्षासुत्र उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचगव्य व गाईच्या शेणापासुन तयार करण्यात आलेल्या राख्या बांधण्यात आल्या.

महाएनजीओ फेडरेशन पुणेचे संस्थापक तथा महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेतुन व संकल्पनेतुन बंध प्रेमाचा, बंध विश्वासाचा रक्षाबंधन निमित्त गोमय रक्षासुत्र उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला.

त्याचाच एक भाग म्हणुन सदरील कार्यक्रम मुक्ताई बहुउद्देशी सेवा विकास संस्था पुणे व जीनियस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक रक्षाबंधनचा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपक्रमाचे महत्व सांगतांना गोमय रक्षासुत्र हे पंचगव्य आणि गाईच्या शेणापासुन तयार करण्यात आलेले असुन पर्यावरण पुरक आहे. या राखी मुळे प्रदूषण होणार नाही.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष निलिमा कदम त्यांचे सहकारी अंकिता जोशी व उज्वला ढवले यांच्या मदतीने शाळेतील प्रिन्सिपल मॅडम शिल्पा नांदगावकर शिक्षिका व विद्यार्थ्यांना दिली.

हा कार्यक्रम जीनियस स्कूल देहूरोड इथे राबवण्यात आला.

