{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

निवडणूक हालचालींना वेग; सोमवारी प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध

संगमनेर । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्याचे वैभव असलेल्या आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची एक हाती सत्ता असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. सुमारे २२ हजार सभासद असलेल्या या कारखान्याची २०२० ची निवडणूक बिनविरोध झाली होती. दरम्यान, विधानसभेनंतर बदलत्या राजकीय समिकरणांमुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
Oplus_131072
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी स्थापन केलेल्या हा कारखाना संगमनेर तालुक्याच्या विकासाचे केंद्र बनला सहकारमहर्षी पा सहकारी साखर आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे संपूर्ण राजकारण या कारखान्या भोवतीच फिरत आहे. संगमनेरसह अकोले व सिन्नर तालुक्यातील सभासद असलेल्या हा कारखाना अनेक राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार राहिला आहे. या कारखान्याभोवती संगमनेर तालुक्याचे राजकारण फिरत आहे. हा कारखाना संगमनेरच्या राजकारणाचा दीपस्तंभ असून अनेकांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच कारखान्या पासून झाली आहे. तर अनेकांचे राजकीय भवितव्य या कारखान्यामुळे घडले आहे. गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता असलेल्या या कारखान्याची निवडणूक होत आहे.
Oplus_131072
सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी कारखान्याच्या निवडणुकीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या कारखान्याची सभासद संख्या सुमारे २२ हजार इतकी असून सर्वाधिक मतदार संगमनेर तालुक्यातीलच आहे. अकोले व शेजारील सिन्नर तालुक्यातील काही सभासद आहे. तर सुमारे तीन ते साडेतीन हजार सभासद हे मयत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ७१ सभासद सोसायटी ठराव घेऊन आहेत. मतदार

यादी प्रसिद्ध झाल्या नंतर हरकती घेतल्या जाणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सभासदा बाबतचे खरे चित्र स्पष्ट होईल.२१ संचालक असलेल्या या कारखान्यात दोन महिला संचालक आहे. तर एक ओबीसी, एक मागासवर्गीय व एक भटक्या विमुक्त जातीचे असे तीन संचालक असणार आहे. या कारखान्याची २०२० साली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक झाली होती.
Oplus_131072
स्थापनेपासून या कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. या कारखान्यात विरोधकांना फारसे स्थान नाही. सभासदांचा माजी मंत्री थोरातांवर विश्वास असल्याने ते त्यांच्या पाठीशी खंबीपणे उभे आहे.
अध्यक्ष प्रतापराव ओहोळ व उपाध्यक्ष संतोष हासे हे काम पाहत असून कार्यकारी संचालक पदावर जगन्नाथ घुगरकर काम करत असून कारखान्याला राज्यस्तरी व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहे. नवीन अत्याधुनिक ५ हजार मॅट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याचे वीज निर्मिती प्रकल्प सुरू आहे. कार्यक्षेत्रात पुरेसा उपलब्ध होत नसल्याने बाहेरून ऊस आणून गाळप हंगाम पूर्ण केला जातो. कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी कारखान्याच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.
विखे पिता – पुत्राच्या भूमिककडे लक्ष !
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याची निवडणूक यंदा तालुक्यात सत्तांतर झाल्याने काहीशी अवघड असल्याचे बोलले जात आहे. यातच विखे थोरात वाद टोकाला गेला असून या निवडणुकीत विखे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील आहेत .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *