आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणाऱ्या गोशाळेत न स्वीकारलेले गोऱ्हे इतरत्र सोडून दिले जात असल्यामुळे कुत्र्यांचा संचार वाढला असून लहान मुलांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो तर कुकुटपालनामुळे निर्माण होणाऱ्या माशांच्या उत्पत्तीमुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारीसह विविध समस्यांनी ग्रामसभा गाजली .
नुकत्याचं झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणे यांनी ग्रामसभेतून घरकुल ‘ जल जीवन , बालविवाह व टी बी मुक्त कायदा , ग्रामपचायत कर आकारणी , आदी शासनाचे विविध विषय ग्रामसभेत मांडत चर्चा घडवून आणली यावेळी संरपच गणपत हजारे , उपसंरपच विक्रम थोरात , रावसाहेब घुगे , सोसायटी चेअरमन बबन कराड , अशोकराव तळेकर , गोपाळ थोरात , रंगन्नाथ मुंढे , पुंजा पाटील नागरे , पांडूरंग सांगळे , गणेश कदम , भारत शेवाळे , मधुकर कदम , जय कदम , दिपक कदम , सूर्यभान थोरात , जालिंदर तळेकर , बळवंतराव थोरात , दत्तू चव्हाण , विठ्ठल घोडेकर आदीसह आरोग्य , कृषी यांच्यासह अनेक विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी गोशाळेतील मृत जनावरांची विल्हेवाट तेथेचं होत असल्याने भविष्यात पाणी हे दुषीत होवू शकते तर गोऱ्हे इतरत्र सोडत असल्याने मोकाट कुत्र्यांचा संचार वाढल्याने त्यांचा त्वरीत बंदोबस्त करा तसेचं कुकुटपालनाच्या माशाच्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचे जन जीवन आस्थव्यस्थ झाल्याने यांचा त्वरीत बदोबस्त करा अशी मागणी ग्रामसभेतून करण्यात आली .

तर ठाकरवाडी येथे नवीन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणीसह जल जीवन योजनेसंदर्भात चर्चा होवून आरोग्य आणि कृषी संबंधित विविध विषयांसह ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन ते संमत झाले ही एक सकारात्मक बाब असू या ठरावांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असे ग्रामपचायतीकडून लोकांना सांगण्यात आले . मात्र गेल्या अनेक ग्रामसभेतून झालेल्या ठरावाची अंमलबजावणी झाली का ? असा प्रश्न अशोक तळेकर , पांडरंग सांगळे यांनी उपस्थित केला .

पानोडी येथील ग्रामसभेत विविध समस्यांवर चर्चा झाली. यामध्ये गोशाळेतील गैरव्यवस्थापन, कुत्र्यांचा वाढलेला उपद्रव, कुकुटपालनामुळे होणाऱ्या माश्यांचा त्रास, नवीन वीजपुरवठ्याची मागणी आणि जल जीवन योजनेसंदर्भात चर्चा झाली. ग्रामपंचायतीने या ठरावांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

