शिवमहिमेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी जनसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

 

 

अस्तगांव । झुंझार न्यूज

 

 

 

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित पंडित प्रदीपकुमार मिश्रा महाराजांच्या महा शिवपुराण कथेला भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांचा जनसागर अस्तगाव येथे उसळला होता. जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी महाराजांच्या सुमधुर वाणीतून शिवमहिमेचा दिव्य अनुभव घेतला.

 

 

कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर आयोजित या अध्यात्मिक सोहळ्याला भाविकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी आहे. भगवान शिवशंकरांच्या महिम्याचे कीर्तनरूपी कथेतील अध्यात्म, ज्ञान आणि संस्कार यांचा संगम भाविकांना आत्मिक समाधान देत आहे, ज्यामुळे हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता, एक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक अनुभव बनला आहे.

 

 

 

 

जनसेवा फाउंडेशन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे सुरेख आयोजन करून अध्यात्म आणि संस्कृतीची श्रीमंती जनमानसात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे, जे खरोखरच स्तुत्य आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यांमुळे समाजातील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जाणिवा अधिक समृद्ध होतात, असे मत अनेक भाविकांनी व्यक्त केले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *