आमदार अमोल खताळ व नीलम खताळ यांच्या हस्ते महाआरती, शहरभर भक्तिमय वातावरण

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध राममंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, योगराज परदेशी आदी राम भक्तांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली.

 

शहरातील चंद्रशेखर चौकातील राममंदिरामध्ये श्रीराम जयंती उत्सव समितीच्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी महिला रामभक्तांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रामजन्माचा पाळणा गात, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला. या वेळी राम भक्तांनी “जय श्रीराम”च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला.

 

राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार खताळ, पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, ऋषिकेश मोंढे, राम मंदिर ट्रस्ट विश्वस्त उपासनी बंधू, विजय नागरीचे उपाध्यक्ष विशाल जाखडी, श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, विनय गुणे, गिरीश देशपांडे, श्रीराम गणपुले, वरद बागुल, मुन्ना जोशी, योगेश मंगलकर, राम वामन, विनायक तांबे, विलास परदेशी, योगराज परदेशी, अक्षय थोरात आणि ऋषिकेश मुळे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शहरातील प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्तांनी गर्दी केली होती.

 

रामजन्मोत्सव समितीच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी थंडगार मठ्ठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक, पंजाबी कॉलनी तसेच नवीन नगर रोडवरील अभिनव नगर येथील राममंदिरांमध्ये उत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. आकर्षक फुलांनी मंदिरांची सजावट करण्यात आली होती तसेच सर्व राम मंदिरे रोषणाईने उजळून निघाले.

“संगमनेर तालुक्यात गेली अनेक वर्षे रावनराज्य होते. मात्र ते जाऊन आता या तालुक्यात खऱ्या अर्थाने रामराज्य आले आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे जन्मोत्सव सोहळे धुमधडाक्यामध्ये साजरे होत आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रामजन्मोत्सव सोहळा शहरातील सर्व श्रीराम मंदिरात धुमधडाक्यात साजरा होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे.”

 

— अमोल खताळ (आमदार)

………………………………………..

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *