{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी परिसरात जलयात्रेचे जल्लोषात स्वागत;

जलव्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा संकल्प

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाण्याचे जे अफाट नियोजन केले होते, त्याचे महत्त्व संपूर्ण देशाला कळावे, यासाठी ३०० वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ शासनाची नसून ती एक लोकचळवळ बनली आहे,” असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

 

चौंडी ते महेश्वर या ‘गोदा-ते-नर्मदा’ जलयात्रेचे आश्वी (ता. संगमनेर) परिसरात आगमन झाले, तेव्हा आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या जलयात्रेचे आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, जोर्वे आणि आश्वी परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आणि बालवारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या निनादात अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलकलशाची महाआरती करण्यात आली. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि जलव्यवस्थापनाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

आमदार पडळकर पुढे म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे जलव्यवस्थापन आजही आदर्श मानले जाते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उभारलेल्या बारवा आणि जलस्त्रोत आजही कार्यान्वित आहेत. त्यांच्या याच कार्याची माहिती अखंड भारताला मिळावी, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या यात्रेत वारकरी होऊन सहभागी झाले असून, पुढील पाच दिवस ते पायी चालणार आहेत.

 

या प्रसंगी बोलताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्याला दुष्काळमुक्त करणे हेच महायुती सरकारचे मुख्य ध्येय आहे. अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेत, जलसंधारणाची ही चळवळ अधिक गतिमान केली जाईल. सामान्यांच्या जीवनात सुबत्ता आणण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे.

 

या कार्यक्रमाला शालीग्राम होडगर, भगवानराव इलग, प्रकाश शिंदे , सरुनाथ उंबरकर , जलसंपदा विभागाचे अधिकारी, महायुतीचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात सर्वत्र भगवे ध्वज आणि ‘जय अहिल्या’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *