{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंझार न्यूज 

जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे शनिवारी संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोध्दार केलेल्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संगमनेर नगरीत भक्ती आणि वारसा यांचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळणार आहे.

 

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या भव्य जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश जल व्यवस्थापन, जल संवर्धन आणि नद्यांचे पुनरुज्जीवन हा आहे.

 

या जलयात्रेचा शुभारंभ २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे आणि होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाल्यानंतर ही यात्रा नाशिक मार्गे संगमनेरमध्ये दाखल होईल.

 

आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजता जलयात्रेचे शहरात आगमन होईल. घुलेवाडी येथून यात्रेचे भव्य स्वागत केले जाईल. पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले असून संपूर्ण शहर भगवे झेंडे, रांगोळ्या आणि स्वागत कमानींनी सजले आहे. चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याच मंदिरात यात्रेतील स्वयंसेवक आणि वारकरी महाआरती करून वंदन करतील.

.

या जलयात्रेत सहभागी असलेल्या रथाच्या माध्यमातून जल व्यवस्थापन आणि जल संवर्धनाबाबत प्रबोधन केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलक्षेत्रातील कार्याची माहिती देणारी चित्रफीत आणि महायुती सरकारने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.


अध्यात्मिक वारसा लाभलेल्या गंगामाई घाटावर यात्रेचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवरामाईच्या जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि प्रवरेचा जलकलश यात्रेत सुपूर्त केला जाईल. राज्यातील एकूण ३० नद्यांमधील पाण्याचे पूजन करून हे जलकलश शेवटी शिर्डी येथे संकलित केले जाणार आहेत.

यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला आ. अमोल खताळ, भाजपा शहराध्यक्षा सौ. पायल ताजणे, गुलाबराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबासाहेब थोरात, शिवसेनेचे विनोद सूर्यवंशी, विठ्ठलराव घोरपडे, कैलास कासार, रामभाऊ राहाणे यांसह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील शेतकरी, वारकरी, महिला आणि सामाजिक संस्थांनी या जलयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed