{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संजीवनी कार्यस्थळावर गोदा ते नर्मदा जलयात्रेचे बिपीनदादा कोल्हे यांनी केले स्वागत

 कोपरगांव । झुंझार न्यूज

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महायुती शासनाचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून जल समृध्दी योजनेतुन प्रत्यक्ष कामावर भर दिला. तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी व्हावी यासाठी नदी जोड प्रकल्पातुन पश्चिम वाहिनी नद्यांचे ७८ टीएमसी पाणी पूर्वेकडे आणण्याच्या कामाला मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस यांनी सुरूवात केली असून हा भाग जलसमृद्ध करण्यावर भर देत असल्याचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी केले. जिरायती भागातील शेतकऱ्यांना निळवंडे चे पाणी देऊन महायुती शासनाने आपला शब्द खरा करून दाखवला आहे असेही ते म्हणाले.

       

जिल्हयाच्या क्रांतिकारी कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जलव्यवस्थापन कार्याचा ठसा संपुर्ण देशभर उमटविला त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमीत्त गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा जन्मभुमी चौंडी (अहिल्यानगर) व त्रंबकेश्वर (नाशिक) येथुन शुभारंभ करण्यांत आला असुन ११७ नद्यांचे पाणी एकत्र करून त्याचा जलकलश सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी आला असता त्याचे पुजन करतांना ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतींने सत्कार करण्यांत आला.

         

प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी प्रास्तविकात या जलयात्रेची संकल्पना स्पष्ट करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई अजितदादा पवार व सर्व मंत्रीमंडळ दुष्काळमुक्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जलसमृध्दीच्या ज्या योजना प्रभावीपणे राबवित आहे त्याचा आपल्यासह सर्व शेतक-यांना अभिमान आहे. अहिल्यानगर जिल्हयाच्या कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, धार्मिक सांस्कृतिक समाजाभिमुख विकास, मंदिर पुर्नबांधणी, घाट निर्माती, धर्मशाळा, तीर्थ विकास, लोकहितवादी प्रशासन, जल व्यवस्थापन, लघुसिंचन आदि कामातुन जलव्यवस्थापनाला दिशा दिली. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमीत्ताने जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी संपुर्ण राज्यभर गोदा ते नर्मदा जलयात्रा काढुन अहिल्यादेवींच्या कार्याची सर्वांना जाणीव करून देत आहेत. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनीही पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातुन कोपरगांव पंचक्रोशीतील भुगर्भातील पाण्याची समृध्दी टिकवुन ठेवण्यासाठी शेकडो बंधारे बांधुन जलसमृध्दीचे कार्य केलेले आहे.

         

याप्रसंगी आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय प्रगल्भ आहे.अहिल्यादेवींनी घाट, विहिरी, धर्मशाळा आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करणे हे खूप मोठे काम केले आहे. अहिल्यादेवींचे काम हातामध्ये घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जल यात्रेबरोबरच , महाराष्ट्राला जलमुक्त करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठे काम सुरू केले आहे. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण देशात साजरी होताना दिसत आहे. अहिल्यानगर जिल्हा नामकरणाचा अभिमान देशभरातील अहिल्याभक्तांना आहे.या वर्षी पहिल्यांदाच अशी जलयात्रा निघाली आहे जी चौंडी येथून महेश्वरपर्यंत जात आहे. “गोदा ते नर्मदा” अशी असून, याचे सर्व श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावागावात हजारो लोक जलयात्रेचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत. अहिल्यादेवींना पाण्याचे महत्त्व माहिती होते. “जल है तो कल है” या भावनेतून त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रायगडावर पाणी व्यवस्थापन केले ते आजच्या दुष्काळातही अभिमानास्पद आहे. आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच असे घडत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जल व्यवस्थापनासह विविध प्रकल्पांना  हजारो कोटी रुपयांचा निधी एकाच वेळी उपलब्ध करून बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. हे सरकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा महायुती शासन प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

           

यावेळी खासदार राम वडकुते, माजीमंत्री व शेतक-यांचे नेते सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी संचालक संतोष तिरमवार, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,  अरुणराव येवले, दिपकराव गायकवाड , शिवाजीराव वक्ते, त्रंबकराव परजणे,शरदराव थोरात, केशवराव भवर, नानासाहेब गव्हाणे,  संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, सौ. उषाताई संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, राजेंद्र कोळपे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव  विधीज्ञ तुळशीराम कानवडे, संजीवनी उद्योगसमूहातील विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी, नगरसेवक,शेतकरी, कार्यकर्ते, खाते प्रमुख उपखाते प्रमुख आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आभार मानले.

कार्यस्थळावर जल कलश, अहिल्यादेवी होळकर अर्धकृती पुतळ्याचे, माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पसह कागदी फुलांचा जलयात्रेवर वर्षाव करण्यात आला. सूर्य आग ओकत असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह प्रचंड होता. सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, राजेंद्र देवकर यांच्यासह सर्वांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी गोदा नर्मदेची ची लेक या गीताने वातावरण फुलून गेले होते. आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, खासदार राम वडकुते यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी सेल्फी घेतला. जल यात्रा संजीवनी कार्यस्थळावर येतात फटाक्यांच्या आतषबाजी सह बँड पथकाच्या निनादात सलामी देण्यात आली. महिला भगिनींनी परिसरात बहारदार रांगोळ्या काढल्या होत्या. कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी जलयात्रेचे स्वागत करणारे फलक व कमानी सजवल्या होत्या.  मंत्री राधाकृष्ण विखे यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी आमचे नेते म्हणून उल्लेख करताच सर्वत्र हशा पिकला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *