सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयात संगीत रजनी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

स्वर सम्राज्ञी पद्मभूषण आशा भोसले यांचे नुकतेच  निधन झाले असून त्यांना अभिवादन म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत महाविद्यालयात एक शाम आशाताई के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक प्रा. विनोद राऊत यांनी दिली आहे.

स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांनी विविध भाषांमधून सुमारे 12000 गीते गायले आहेत. मराठीमधील लोकगीते, कोळीगीते ,याचबरोबर त्यांचे भजन आणि अभंगही अत्यंत प्रसिद्ध आहेत. मागील आठ दशके त्यांनी भारतीय रसिकांच्या मनावर राज्य केले असून आपल्या गायनातून जनतेची सेवा केली आहे.

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पद्मश्री आशाताई भोसले यांचे स्नेहाचे संबंध राहिले त्यामुळे आशाताई ह्या संगमनेरला 2014 मध्ये कार्यक्रमासाठी आल्या होत्या याचवेळी सुधीर गाडगीळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. यानंतर ही संगमनेरच्या प्रत्येक कार्यक्रमात आशाताई भोसले यांनी आवर्जून लोकनेते बाळासाहेब थोरात यांना फोन करून संगमनेर मधील नागरिकांशी संवाद साधला होता.

त्यांच्या निधनाने देशाच्या संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून आशाताईंना अभिवादन म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने एक शाम आशाताई के नाम हा कार्यक्रम शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेस महाविद्यालयात होणार आहे. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आ. डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, पद्मश्री रघुवीर खेडकर, डॉ जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, डॉ मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर मधील विविध मान्यवर व संगीत प्रेमी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला असून संगमनेर मधील सर्व संगीत प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयहिंद लोक चळवळ, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय, प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ व प्रा विनोद राऊत  यांनी केले आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *