{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

शिर्डी । झुंझार न्यूज

कामगारांनी श्रध्दा आणि सबुरीने केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून, विश्वसाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आनंदचा क्षण तुमच्या सर्वाच्या जीवनात आला आहे.यशात अनेकांचे योगदान आहे.पण आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवा असा सल्ला जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

 

शिर्डी संस्था मधील ४८८कामागारांना सेवेत कायम करण्याच्या संदर्भात न्यायालयाने महत्वपुर्ण आणि ऐतिहसिक निर्णय दिला.मंत्रालय स्तरावर मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची कृतज्ञता म्हणून कामगार संघटनेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

 

याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात अतिरीक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे शिर्डी संस्थांनचे मुख्यकार्यकरी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपनगराध्यक्ष अभय शेळके कामगारांच्या पतपेढीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी कामगारांच्या वीस वर्षांच्या लढ्याचा उल्लेख करून सर्व कामगार विश्वासाने एकत्र राहीले हे महत्वाचे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळे हे साध्य होवू शकले.अनेकांनी बुध्दीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण श्रध्दा आणि सबुरीच्या मंत्राने तुम्ही यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुर्वी १०५२कामगारांचा निर्णय करताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी मोठे धाडस दाखवले.स्व.जयंतराव ससाणे आणि मी पाठपुरावा केला तेव्हा तो पहीला निर्णय होवू शकला.तेव्हाही अनेकजण देव पाण्यात घालून बसले होते.पण जिथे मनात काम करण्याची प्रामाणिक भावना असते तिथे साईबाबा पाठीशी उभे राहातात.


शिर्डीसाठी कोणताही निर्णय करताना स्वार्थ कधी मनाला शिवला नाही.तसा संस्कार वाडवडीलांनी केला नाही.सामाजिक बांधिलकीने काम करत राहीलो म्हणून अनेक वर्ष या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत गेली.दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करायची पण जनतेशी प्रतारणा करायची नाही हीच भूमिका कामगारांच्या लढ्यात सुध्दा ठेवल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कामगारांची जबाबदारी आता वाढली आहे.येणार्या भाविकांचे तुम्ही स्वागत कसे करता यावर शिर्डीचा नावलौकीक अधिक वाढणार आहे.देशात अनेक अध्यात्मिक क्षेत्र विकसित झाले आहेत.भाविक भावनेप्रमाणे जात असतात.त्यामुळे शिर्डीत चांगले वातावरण सुरक्षा आणि स्वच्छता ठेवण्याचे आव्हान तुम्हाला स्विकारावे लागणार आहे.

शिर्डी परिसराचा विकास चांगल्या पध्दतीने होत असून विमानतळ बाह्यवळण रस्ता करताना अनेक अडचणी आल्या टिकाही झाली पण त्याचे महत्व आज सर्वाना समजले.निळवंडेचे पाणी आल्यामुळे दुष्काळातही दिलासा देता आला.अन्य ठिकाणी परीस्थीती भयानक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

 

डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांच्या आरोपाला आणि टिकेला आता पूर्णविराम मिळाला असून,शब्दपूर्तीचा आजचा दिवस आहे.केवळ जनतेचे प्रेम विखे परिवाराला मिळते त्याची उतराई करण्याचे काम आम्ही करतो.ना.विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला त्याचे फळ आज कामगरांना मिळाले आहे.याप्रसंगी मुख्यकार्यकरी अधिकारी गोरक्ष गाडीलकर विठ्ठलराव पवार यांची भाषण झाली.@all

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *