लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निसरनेश्वर परिसराचा विकास–मा. आमदार डॉ. तांबे
संगमनेर । झुंझार न्यूज
भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. सणासुदीचा हा काळ असून अध्यात्म आणि निसर्ग यातून माणसाला आनंद मिळतो. संगमनेर तालुक्यातील निसरनेश्वर बाळेश्वर रामेश्वर खांडेश्वर यांसह विविध देवस्थानांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने निधी दिला असून त्यांच्या प्रयत्नातून निझरनेश्वर परिसर सुंदर झाले असल्याचे प्रतिपादन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
कोकणगाव येथील निझरनेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त माजी आमदार डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिलीप जोंधळे, गोपीनाथ पानसरे, सोमनाथ जोंधळे, शिवाजी जोंधळे, बबन पवार ,गंगाधर वायकर, दगडू जोंधळे, रामनाथ शिंगोटे, निवृत्ती पानसरे यांच्यासह विविध ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकासाच्या योजना राबविण्यात आले आहे याचबरोबर संगमनेर तालुक्यामध्ये असलेले निझरनेश्वर, रामेश्वर, बाळेश्वर, अमृतेश्वर, दुधेश्वर, खांडगाव येथील खंडेश्वर अशा विविध महादेवांच्या मंदिरांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे याकरता त्यांनी सातत्याने निधी दिला आहे.
कोकणगाव व निझरनेश्वर परिसरासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी दिला असून त्या माध्यमातून हे धार्मिक स्थळ अनेक भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. श्रावण महिना हा आनंदाचा व सणासुदीचा काळ असतो. या महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने भाविक कोकणगावला येत असून सर्व भाविकांचे अद्यावत सुविधा व्हावी याकरता त्यांनी चांगल्या सुविधा निर्माण करून दिले आहेत. यापुढील काळातही या परिसराच्या विकासाकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून काम केले जाईल असे ते म्हणाले.
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की संगमनेर तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा या श्रावण महिन्यात अत्यंत सुंदर दिसतात त्यामुळे आपल्या तालुक्यात असलेले बाळेश्वर निजरणेश्वर रामेश्वर दुधेश्वर हे डोंगरावरील महादेवाचे मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. श्रावण महिना हा आनंदाचा काळ असून यावर्षी पाऊसही चांगला झाला आहे . यापुढील काळातही चांगला पाऊस पडून तालुक्यातील व राज्यातील शेतकरी महिला नागरिक सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी निझरनेश्वर चरणी केली.
यावेळी मंदिर देवस्थानच्या वतीने माजी आमदार डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





