पालकमंत्री राधाकृष्ण विखे आमदार अमोल खताळ यांनी साधेपणाने घेतले संगमनेरच्या गणरायांचे दर्शन
संगमनेर । झुंझार न्यूज
गणेशउत्सवानिमित्त शहरातीलगणेश मंडळांना भेट देताना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आपल्या नेहमीच्या शासकीय वाहनांचा ताफा आणि लवाजमा बाजूला ठेवत अत्यंत साधेपणाने गणेशभक्तांमध्ये मिसळण्याचा अनोखा अनुभव दिला. विशेष म्हणजे, आमदार अमोल खताळ पाटील स्वतः दुचाकी चालवत असताना पालकमंत्री विखे पाटील हे त्यांच्या पाठीमागे बसून शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी पोहोचले.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या साधेपणाने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही मोठा शासकीय ताफा किंवा विशेष व्यवस्था न करता ते थेट गणेशभक्तांमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी विविध मंडळांच्या गणरायांचे दर्शन घेत आरती केली तसेच उपस्थित गणेशभक्तांशी संवाद साधला.
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, सुतार गल्ली मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, जय जवान चौक मित्र मंडळ, विद्यानगर तरुण मित्र मंडळ आणि आमदार अमोल खताळ पाटील तरुण मित्र मंडळ यांसह सुकेवाडी येथील महागणपती तसेच महावितरण कंपनी कार्यालया च्या आवारातील शम्मी गणपतीचे दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली. गणेश मंडळांच्या ठिकाणी पोहोचताच पालकमंत्री विखे पाटील आणि अमोल खताळ पाटील यांनी उपस्थित गणेशभक्तांना हात जोडून अभिवादन केले. त्यांच्या या साध्या व आपुलकीच्या वागणुकीमुळे नागरिकां मध्येही उत्साह दिसून आला.आमदार अमोल खताळ पाटील यांच्या दुचाकी वरून पालकमंत्र्यांनी केलेला गणेश दर्शनाचा हा प्रवास संगमनेरच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी क्षण ठरला.
शासकीय गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून दुचाकीवरून थेट गणेशभक्तां मध्ये मिसळलेले पालकमंत्री, हा प्रसंग उपस्थितांसाठी कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पदाचा औपचारिकपणा बाजूला ठेवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा साधेपणा रस्त्याने जाणारे येणारे गणेश भक्त पहात होते