आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्नी तथा संगमनेर नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे आज दर्शन घेतले.
यावेळी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून महाराष्ट्रात बळीराजावर असलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेतली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत विविध विषयांवरही अनौपचारिक चर्चा झाली.