देश पातळीवर अमृतवाहिनीचा 6 पुरस्कारांनी गौरव

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

राज्याचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये गुणवत्ता,व्यक्तिमत्व विकास, उत्कृष्ट निकालाची परंपरा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा संशोधन शिस्त आणि सुंदर वातावरण असणाऱ्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवरील 6 पुरस्कार प्राप्त झाले असून अमृतवाहिनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.प्रसाद बाविस्कर यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या विविध सहा पुरस्कारांच्या बाबत माहिती देताना प्राचार्य डॉ.बाविस्कर म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवत्तेमधून देशपातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे.

राजस्थान जयपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत यावर्षी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदनाबद्दल आयोजित नॅशनल लेवल इंडस्ट्री अकॅडमी कॉन्क्लेव्ह एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2026 मध्ये विविध क्षेत्रांमधून अमृतवाहिनीला सहा पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये बेस्ट परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट अवॉर्ड 2026, तर वाधवानी फाउंडेशन बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट अवॉर्ड, मायक्रो चीप सेंटर ऑफ एक्सलन्स, फाईव्ह इयर्स ऑफ पार्टनरशिप अवार्ड, वन मिलियन वर्च्युअल इंटरशिप यशस्वी योगदान पुरस्कार, इलेक्ट्रिक इंजीनियरिंग विभागाला उत्कृष्ट डिपार्टमेंट पुरस्कार, असे वेगवेगळे सहा पुरस्कार मिळाले.

उद्योग विश्वातील बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना ए आय क्लाऊड कॉम्पिटिंग अँड सायबर सिक्युरिटी यासारख्या अत्याधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवल्याबद्दल महाविद्यालयाचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

अमृतवाहिनीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, अनिल शिंदे,प्रा.व्ही.बी.धुमाळ यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


बदलत्या तंत्रज्ञानानुसार व उद्योग जगताच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना नवीन प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण उद्योगाभिमुख शिक्षण याचबरोबर कॉम्प्युटर आणि एआयतंत्रज्ञान वापर, परदेशी भाषा अशा विविध सुविधा दिल्या जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून देशाचे आदर्श युवक घडवण्याचे काम अमृतवाहिनीतून सातत्यपूर्ण होत आहे. मिळालेले पुरस्कार हे सामूहिक यश असून या पुढील काळातही अधिक गुणवत्तेने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल

सौ.शरयूताई देशमुख

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *