संगमनेर | झुंजार न्यूज
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमन पदी खेमनर नारायण सहादू यांची तर व्हाईस चेअरमन पदी डेंगळे सुधीर राधाकिसन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अमृतवाहिनी पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडीच्या वेळी संचालक भारत बोरकर नितीन जोंधळे अशोक वाळे दादाभाऊ शेपाळ संजय बबनराव कुटे मनोज वाकचौरे मेघा कोकाटे सुषमा शिरसागर विक्रम अभंग संस्थेचे सेक्रेटरी भास्करांना मुंगसे विश्वास वाघ योगेश गुंजाळ विलास शिंदे आदी उपस्थित होते.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सेवकांची पतसंस्था ही सातत्याने ऑडिटच्या दर्जात असून संस्थेचा उत्तम कारभार आहे संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक 2023 ते 28 करता बिनविरोध झाली असून आज चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवड ही बिनविरोध करण्यात आली.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे
