Shirdi l Zunjar News

साईबाबांच्या दर्शनासाठी 25 एप्रील ते 15 जुन 2023 या काळात शिर्डीत आलेल्या 26 लाख भाविकांनी 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रूपयांचे घसघशीत दान  साईंच्या झोळीत अर्पण केले. तर सशुल्क दर्शन  व आरती द्वारे 11 कोटी 55 लाख 6 हजार 997 रूपयांचे उत्पन्न साईसंस्थानला  मिळाले.

 

साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून येत असलेल्या हजारो भाविकांनी साई दर्शनानंतर  साईबाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. साईभक्तांच्या दानातून  साईसंस्थान देशातील क्रमांक दोनचे देवस्थान बनले आहे. याच दानातून शिर्डीत भाविकांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

 

साईबाबांना मिळालेल्या दानाचा तपशील साईंच्या चरणी दान  (25 एप्रील ते 15 जुन) देणगी काउंटर – 25 कोटी 89 लाख 70 हजार 382, दक्षिणा पेटी – 9 कोटी 83 लाख 32 हजार 842, डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे – 5 कोटी 15 लाख 28 हजार 755, ऑन लाईन देणगी – 3 कोटी 34 लाख 44 हजार 543,चेक ,डीडी द्वारे – 1 कोटी 82 लाख 61 हजार 806, मनी ऑर्डर द्वारे – 27 लाख 37 हजार 19, सोने 2193.440 ग्रँम – 1 कोटी 17 लाख 59 हजार 125,चांदी 52121 ग्रँम – 28 लाख 49 लाख 88, सशुल्क दर्शन व आरती द्वारे उत्पन्न – सशुल्क दर्शन पास – 8 कोटी 30 लाख 57 हजार 997, सशुल्क आरती पास – 3 कोटी 24 लाख 49 हजार.

या काळात 22 लाख 41 हजार 300 भाविकांनी साईप्रसाद भोजन घेतले तर दर्शन रांगेद्वारे याच काळात 21 लाख 9 हजार 523 भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले

7 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिर्डीत

 

देशाच्या महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू दिनांक 7 जुलै 2023 रोजी शिर्डी येथे साईदर्शनासाठी येणार असल्याने साईमंदीर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *