संगमनेर | झुंजार न्यूज

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पीकांची भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असून, तालुक्यातील 54 हजार 269 शेतकऱ्यांना 45 कोटी 57 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

आश्वी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जुन 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीनंतर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले होते. मदतीच्या आलेल्या प्रस्तावाचा विचार करुन राज्य सरकारने अतिवृष्टीचा निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून तालुक्यातील 163 गावांतील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

संगमनेर तालुक्यातील 54 हजार 269 शेतकऱ्यांना 45 कोटी 57 लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे मोकळा झालेला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वीही तालुक्यात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या 155 शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख रुपयांची मदत सरकारने घोषित केली असून, या मदतीचा निधीही शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ अशोक इथापे , तालुकाध्यक्ष सतिष कानवडे , जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर , भगवानराव इलग , गोकूळ दिघे , सचिन शिंदे , अशोकराव ज-हाड , तबाजी मुन्तोडे , निवृत्ती पा सांगळे , शिवाजीराव कोल्हे , जेहूरभाई शेख , अशोक खेमनर , सुनिल मुन्तोडे , सतिष जोशी , भारतराव गीते , रमेश गीते , श्रीकांत गोमसे , शिवाजी इलग , राजेंद्र जाधव , अशोक खेमनर , मोहीत गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *