राहुरी । झुंजार न्यूज

 

केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्ष हा तळागाळापर्यंत व बहुजन समाज्यात जावून पोहचला अजून संध्या रिपाईच्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचं पार्श्वभूमीवर उत्तर जिल्ह्याची कार्यकारिणी कणखर व कार्यश्रम बनविण्याकरिता रविवार दि १७ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता राहुरी येथील जयश्री हॉटेल मध्ये महिला आघाडी बैठक रिपाई महिला प्रदेश आघाडीच्या अध्यक्षा तथा पिंपरी – चिंचवड येथील नगरसेविका श्रीमती चद्रकला सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती रिपाई उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा संपुर्ण देशातील तळागाळापर्यत पोहचविण्याचे काम केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांनी केले असून प्रत्येक समाज्यातील माणसांना पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली . गावोगावी हा रिपाईचा कार्यकर्ता निर्माण झाला . तर राष्ट्रीय अध्यक्षा सौ सिमाताई आठवले यांच्या नेतृत्वाखाली महिलाचे मोठे संघटन करण्यात आले आहे . पक्षात महिलांना ही काम करण्याची संधी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात महिला या पुढे येवू लागल्या आहेत . त्याचं धरर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातून महिलांची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी राहुरी येथील जयश्री हॉटेल ( कारखाना फाटा ) येथे गुरुवार दि .१७ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हास्तरीय महिला कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आली असून जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , महा राज्य सचिव अध्यक्ष राजाभाऊ कापसे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात  आदीचे मार्गदर्शन होणार आहे . 
तरी होणाऱ्या महिला आघाडी बैठकीकरिता मोठया संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे आवाहन करण्यात आले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *