संगमनेर शहर : प्रतिनिधी                                                                                                                        शेती मधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असणाऱ्या पानोडी येथील सोमनाथ बाळासाहेब जाधव या २८ वर्षिय तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. शेती सह मेंढपाळ असणार्‍या कुटुंबातील सोमनाथ याने मिळवलेल्या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थानी कौतुक केले .

शेतीसह मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबातील सोमनाथ याचे गावातीलचं जाधव वस्तीवरील असणार्‍या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. तर सरदार थोरात विदयालयात  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आश्वी खुर्द येथील कॉलेजमधून १२ वी कॉमर्स शाखेमधून ६५ टक्के गुण मिळवले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले. घरची स्थिती हलाखीची असल्याने पुणे येथे पार्ट टाईम काम करुन पुढील शिक्षण घेतले . सोमनाथला एक ना अनेक अडचणी आल्या; परंतु मनात जिद्द होती. वडील बाळासाहेब जाधव हे मेंढपालन करत रिकाम्या वेळेत इतराच्या शेतात जावून बैलाच्या मदतीने नांगरणी , शेती मशागत करुन त्यांतील मिळणाऱ्या पैशातून घरखर्च करुन उर्वरीत मुलाला पैसे पाठवून  उच्च शिक्षणासाठी मदत करून चार्टड अकाऊटंट होण्यासाठी प्रेरणा दिली. त्याने सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया पूणे येथे पूर्ण केले; तर आर्टिकलशिप  रामचंद्र विठ्ठल सागर यांच्याकडे पूर्ण केली.  सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत यश मिळवले. ग्रामीण भागातील, शेतकरी व मेंढपाळ कुटुंबातील असलेला सोमनाथन न्यूनगंड बाजूला ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने आणि जिद्दीने मिळविलेले यश इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून रामचंद्र विठ्ठल सागर व दिपक सूर्यभान जाधव या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य सोमनाथला मिळाल्याने सी ए होणारा पानोडी या गावांचा पहिला विद्यार्थी ठरला आहे .                                                                                                          यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खा डॉ सुजय विखे पाटील , यांनी सोमनाथ जाधव यांचे अभिनंदन केले .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *