संगमनेर : प्रतिनिधी संगमनेरला गेल्या महिन्यात पार पडलेल्या साकूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून तेथील दोन पाटलाच्या गटांमध्ये उफाळलेला राजकीय वादात मागसवर्गिय दलित समाज्याला नाहक भराडले जात असून समाज्या – समाज्यात राजकारणातून तेढ निर्माण करणाऱ्या त्या राजकिय पुढार्यांची विविध पदावर असणार्या पदावरुन त्वरीत हकलपट्टी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्रारे विविध दलित संघटनेनी प्रांत आधिकाऱ्यांना दिले . या निवेदनात म्हटले की , ग्रामसभेत पाणी प्रश्न उपस्थित केलेल्या सुनिल इघे व सहकारी सामाजिक कार्यकर्त्याला धक्का – बुक्की केल्याने त्यांनी तेथील प्रतिष्ठित पुढा-यासह काही जणावर गुन्हा दाखल केले यांचा राग धरुन रात्रीच्या सुमारास निर्जन स्थळी त्यांना बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले त्यानंतर त्या पुढार्यावर अट्रोसिटी अक्टसह विविध गुन्हे दाखल झाले तर सत्ताधारांनी संरपचासह दलित लोकांना हाताशी धरुन विरोधाकावर गुन्हे दाखल केले यांचा परिणाम म्हणून विरोधी गटातील जमावाने साकुरच्या विद्यमान दलित सरपंचाच्या घरावरच हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोर जमावाने नूतन सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तेथे उपस्थितीत असलेल्या महिलांचाही विनयभंग केला. त्यावरुन विरोधी गटाच्या सतरा जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अॅट्रोसिटी) विनयभंगाच्या कलमांनुसार घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाला . यामुळे साकूरमधील वातावरण पुन्हा तापले असून या राजकीय वादातून दलित समाज्याच्या लोंकावर अन्याय होत असून विनाकारण दलित समाज्याला बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचे दिसत आहे .गेल्या अनेक दिवसापासून साकूरमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित असणार्या दोन पाटलाचा राजकिय कुरघुड्या होत असून राजकारणात आपलीचं पोळी शिजवावी म्हणून राजकिय वाद चालू आहे . हे समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रकार असून दलित समाज्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असून अशा राजकिय पाटलांवर कारवाई झाली पाहिजेल अशी मागणी विविध दलित संघटनेनी केली आहे . यावेळी रिपाई ( आठवले गट ) तालुकाध्यक्ष आशिष शेळके , दलित पँथर संघटना शहराध्यक्ष राजू खरात , एकतावादी संघटनेचे अध्यक्ष अॅड किरण रोहोम , रिपाई तालुका युवकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार , एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , सोमनाथ भालेराव , किशोर चव्हाण , प्रविण गायकवाड , विजय खरात आदिसह मोठ्या संख्येने उपस्थित होते .
चौकट ः या कुरघोड्या राजकारणामुळे जे लोक समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करुन दलित समाज्याला बदनाम करु पहात आहे अशा व्यक्तीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी तथा संस्कृत राजकारणी व्यक्तीमत्व असणार्या आ बाळासाहेब थोरात यांनी संबंधीत व्यक्तीवर त्वरीत कारवाई करुन त्यांना पद मुक्त करावे अशा व्यक्तीना समाज कधीच स्विकारणार नसून गुन्हा दाखल झाला असताना साकूरच्या त्या व्यक्तीची उपसंरपचपदी निवड कशी झाली यांची चौकशी व्हावी असे आवाहन रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केली .
