महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनमानसातील लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील अश्वि इंग्लिश स्कूल येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून अजितदादांच्या कार्याचा गौरव केला .
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र भूषण आणि प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर होते. त्यांनी आपल्या शैलीत अजितदादांच्या कार्यतत्परतेचे आणि प्रशासनावरील पकडीचे कौतुक केले. याप्रसंगी जेष्ठ रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त करताना अजितदादांच्या नेतृत्वाखालील विकासकामांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ , स्कूल कमिटीचे सदस्य सुमतीलाल गांधी, गणेश गायकवाड आणि सतीश होडगर यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण , पर्यवेक्षक थेटे, शहाणे शिक्षक , विद्यार्थी व पालक उपस्थित होते .
यावेळी दादांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांनी राज्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांवर प्रकाश टाकला. ‘दादा’ हे केवळ नाव नसून ती विकासाची एक गॅरंटी आहे, अशा भावना बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .