वर्षभरात वाचनालयाची इमारत उभारून अभ्यासिका सुरू करणार

 

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सोनेवाडीत विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते करायचे असते; इतर वेळी जनतेच्या विकासासाठी काम करायचे असते. लोकप्रतिनिधी म्हणून गावातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या मूलभूत समस्या सोडविणे आणि तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, हीच माझी प्राथमिकता आहे. सोनेवाडी ग्रामस्थांनी वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. वर्षभराच्या आत येथे वाचनालयाची इमारत उभारून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याची जबाबदारी मी घेतो. गावाच्या विकासकामांसाठी निधीची काळजी करू नका, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सुमारे एक कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर भाजप जेष्ठ नेते भीमराज चत्तर निमोण सरपंच संदीप देशमुख शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे हरीशचंद्र चकोर संपत फड माजी सरपंच पांडुरंग गोमासे राहुल गोमासे
सुधीर घुगे सुवर्णा सांगळे गणेश सानप गोरख गाडेकर अमोल अंधाळे रणजित जाधव योगेश डोंगरे आकाश सानप आदी सह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होणार आहे


आमदार खताळ म्हणाले की, आपण आमदार झाल्यानंतर सोनेवाडी गावातील विविध विकासकामांसाठी सुमारे एक कोटी ३९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायतीच्या मागील साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात मिळालेला निधी यापेक्षा वेगळा आहे. छोट्या गावाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळणे, ही समाधानाची बाब आहे.पूर्वी टँकरने पाणी आणणे, पाण्याचे पूजन करणे आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्याच समस्येला सामोरे जाणे, असे चित्र अनेक वर्षे होते. मात्र, आपण आमदार झाल्यानंतर योगायोगाने जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आले. त्यांच्याकडे पाठपुरावा करून मागील वर्षी चारीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेतला. अनेक अडचणींवर मात करून तळेगावच्या माथ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आता भोजापूर चारीच्या कामासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या चारीच्या रुंदीकरणाची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

केवळ भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतरच या भागातील गावांना पाणी मिळावे, अशी परिस्थिती कायम राहू नये. कमी पाऊस झाल्यास पाणी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे निमोण-तळेगावसह पाण्यापासून वंचित असलेल्या परिसराचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या माध्यमातून भविष्यात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहे. तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे जावे लागू नये, तर स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी औद्योगिक विकासावर भर देणार आहे. कवठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) प्रस्ताव पुढे नेण्यासाठी पाठपुरावा केला आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारणीला चालना मिळेल. यामुळे मोठ्या उद्योगांसोबतच लघुउद्योग आणि पूरक व्यवसायांच्या संधी निर्माण होतील. स्थानिक तरुणांनी उद्योजक बनावे आणि गावातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, हे आपले स्वप्न असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.


दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एकल महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. महिला बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराचे जाळे निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

श्री अमोल खताळ पाटील आमदार

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *