झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राळेगणसिद्धी येथे कन्हैया सोशल फाउंडेशनच्या वतीने मा. सुरेश पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘कन्हैया मॅरेथॉन २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. युवकांमध्ये क्रीडा, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीची भावना रुजविणाऱ्या या उपक्रमाला खेळाडू आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी खेळाडूंशी संवाद साधत डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि भविष्यातही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कन्हैया सोशल फाउंडेशनच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच विखे पाटील परिवाराच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांनी मा. सुरेश पठारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री गीतांजलीताई शेळके, श्री विश्वनाथ चेडे, श्री प्रशांत गायकवाड, श्री राहुल शिंदे पाटील, श्री मच्छिंद्र लंके श्री विजू औटी, श्री युवराज पठारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *