{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

पिंप्री, खळी आणि वैजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील खळी येथील रहिवासी आणि मूळच्या पिंप्रीच्या लेक असलेल्या सौ. स्वाती मुंढे-नागरे यांनी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या वैजापूर येथे स्थायिक असलेल्या डॉ. स्वाती नागरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून इंग्रजी साहित्य विषयात पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे.

डॉ. स्वाती नागरे यांनी इंग्रजी साहित्यातील स्त्रीवाद आणि स्त्री संवेदनशीलता या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. एम.ए., बी.एड., डी.एड. यानंतर त्यांनी पीएच.डी. संपादन करून ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षण आणि जिद्दीच्या माध्यमातून उच्च शिखर गाठण्याचा आदर्श निर्माण केला आहे.

या संशोधन प्रवासात त्यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष चौथाईवाले, विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद उबाळे, बाह्य परीक्षक प्रा. डॉ. केतन गेडिया (अहमदाबाद, गुजरात), मौलाना आझाद महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. कलिमोद्दीन शेख, माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुस्तजिब खान, प्रा. डॉ. रविकांत जाधवर, प्रा. डॉ. भाऊसाहेब आंधळे, प्रा. डॉ. अनिल शहाणे, तसेच प्रा. डॉ. गायकवाड (गंगापूर) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संशोधक विद्यार्थ्यांनीही वेळोवेळी त्यांना सहकार्य केले.

डॉ. स्वाती यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा आहे. त्यांचे पती बाळू किसन नागरे हे जि. प. प्राथमिक शाळा, लक्ष्मीवाडी (शिवराई), ता. वैजापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी पत्नीला उच्च शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले.

त्यांचे वडील श्री. ज्ञानदेव सोपान मुंढे (रा. पिंप्री) यांनीही मुलीला उच्च शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली. त्यांचे बंधू इंजिनियर अमोल मुंढे हे सध्या लंडन येथे उच्च शिक्षण घेत असून, बहिणीच्या या उल्लेखनीय यशाचे तेही साक्षीदार ठरले आहेत.

ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील एका मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर डॉक्टरेट पदवी संपादन करणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे. डॉ. स्वाती नागरे यांच्या या यशामुळे पिंप्री, खळी आणि वैजापूर या तिन्ही ठिकाणांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *