आमदार अमोल खताळ आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथील सातपुते परिवाराने आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज कमानीचे लोकार्पण आमदार अमोल खताळ पाटील आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या हस्ते करण्यात आले


संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर गावातील सातपुते मळ्यात अनेक वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे सातपुते परिवाराने आपल्या आईच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत ही कमान उभारली आहे या कमानीमुळे धार्मिक व सामाजिक वैभवात भर पडली असून, आईच्या स्मृती जपण्याचा सातपुते परिवाराचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.


या कार्यक्रमास महायुतीचे केशवराव जाधव, अरुण शेटे, सरपंच तुषार सातपुते, उपसरपंच गोविंद शिंदे, पोपट सातपुते, भारत शिंदे, नितीन शिंदे, माजी उपसरपंच राजू सातपुते, दत्तू सातपुते, बिरू शिंदे, विकास शेटे, नामदेव सातपुते, रविंद्र काशीद, अक्षय तोरणे यांच्यासह सातपुते परिवारातील सदस्य, ग्रामस्थ व श्री स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कै. सुमनबाई सातपुते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेले हे महाद्वार केवळ प्रवेशद्वार नसून, सातपुते परिवाराने आपल्या आईप्रती व्यक्त केलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, तसेच त्या स्मृतींना सामाजिक आणि धार्मिक कार्याची जोड मिळावी, या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.


श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या महाद्वारा मुळे ग्रामस्थांसह स्वामी भक्तांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *