{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

बाळूमामा कमानीचा आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

बाळूमामा यांच्या नावाने कमान उभी करण्याची इच्छा भक्तमंडळाची होतीच; मात्र माझ्या हातून ही कमान पूर्ण व्हावी, अशी इच्छा बाळूमामांची होती. त्यामुळे कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून या कमानीचे काम पूर्ण केले असून, आमदारकीच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात समनापुर गावात दीड कोटीची कामे केली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे बाळूमामा मंदिर कमानीचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पानंद रस्ता समितीचे सदस्य म्हतु शेरमाळे माजी सरपंच भाऊसाहेब शेरमाळे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रणजीत जाधव संजय चांडे,मधुदादा शेरमाळे, भागवत हळनर , संपत गेठे भाऊ शेरमाळे, पांडुरंग शेरमाळे, रामनाथ केसकर, हौशीराम, शेरमाळे, काका साहेब गुंजाळ,अण्णा शेरमाळे, , रावसाहेब शेरमाळे, संदीप शेरमाळे, बाबू शिरमाळे, सुनील चांडे, एकनाथ शेरमाळे, मच्छिंद्र शेरमाळे, अबू इनामदार, ज्ञानदेव शेरमाळे, राजू शेरमाळे, बापू दळवी, देवा शेरमाळे राजू गायकवाड, भागवत शेरमाळे, मनोज भास्कर, राहुल भास्कर, सोमनाथ शेरमाळे, लहानु शेरमाळे, रणजीत कोल्हे यांच्यासह, भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. खताळ म्हणाले की, आमदार होऊन मला दीड वर्ष झाले आहे. या कालावधीत समनापूर गावासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आगामी काळातही गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याचा मानस आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे.

गेल्या चाळीस वर्षांत कोणी काय दिले आणि काय दिले नाही, याची चर्चा मला करायची नाही. मात्र, तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण करण्यावर आपला भर आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातूनही विविध विकासकामे मार्गी लावली जात आहेत. आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना-महायुतीमध्ये आले असून, त्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी निधीची अजिबात चिंता करू नये. पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याला सरकारच्या माध्यमातून प्राधान्य दिले जात आहे.

संगमनेर तालुक्यात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, तो सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी कौठे मलकापूर येथे एमआयडीसी उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरवस्था लक्षात घेता आगामी काळात शाळांच्या दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.

महायुती सरकार हे सर्वांचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपले सरकार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

 

— अमोल खताळ, आमदार
……………………………………………………. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *