नाशिक येथील स्वामी विवेकानंद नगर, सिडको येथे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री कै. बबाबाई मारुती घुगे यांच्या स्मरणार्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार सोमनाथ डोळे यांना ‘पत्रकार भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोकुळभाऊ गिते यांच्या मातोश्री आदर्श माता सुनिताताई बबनराव गिते होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड, नगरसेविका छायाताई दिलीप देवांग, कृषी अधिकारी रणजित आंधळे, समाजसेवक देवाभाऊ वाघमारे, रंगनाथ दरगुडे, दिलीप देवांग, सामाजिक कार्यकर्त्या शोभना सोनवणे, प्रकाश सोनवणे, डॉ. उल्हास कुटे, डॉ. बी. बी. देशमुख, ओमकार कापकर, बाबा अहिरे, उत्तम काळे, दशरथ गांगुर्डे, भाजपचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भालेराव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग सेवक तथा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी केले.
नगरसेविका छायाताई देवांग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. या पुरस्कार सोहळ्यातून प्रेरणा मिळते.
दैनिक महासागरचे संपादक जयंत महाजन यांनीही बाळासाहेब घुगे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. दिव्यांग असूनही ते समाजासाठी एवढे मोठे कार्य करीत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब असून, त्यांच्या कार्याचा आपल्यालाही हेवा वाटतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती केदारे व बी. के. नागरे यांनी केले. सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि माणुसकीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान व ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड, मुंबई यांचे अनमोल सहकार्य लाभले.
यावेळी दैनिक सार्वमत, दैनिक ,प्रभात, दैनिक नायक, दैनिक अहिल्यानगर दृष्टीचे, झुंजार न्यूज, राजसत्ता न्यूज चे पत्रकार सोमनाथ भागवत डोळे यांना ‘पत्रकार भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार गोकुळभाऊ गिते यांच्या मातोश्री आदर्श माता सुनिताताई बबनराव गिते म्हणाल्या की, सोमनाथ डोळे हे शेतकरी कुटुंबातील असून संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील रहिवासी आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.