{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

दुष्काळ निवारणासाठी साईबाबा संस्थानचे ५ कोटींचे योगदान, मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द

 

मुंबई । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. त्याच भावनेतून संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक योगदान देण्यात आले आहे.

या रकमेचा धनादेश आज मुंबई येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, जनावरे आणि ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत – जसे टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे. या कार्याला हातभार लावण्यासाठी साई संस्थानने हे ५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.श्री साईबाबा संस्थान हे केवळ मंदिर व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता, शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

यापूर्वीही कोविड काळात, महापुरात आणि विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये संस्थानने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.
भाविकांच्या देणगीतून जमा होणाऱ्या पैशाचा विनियोग अशा लोककल्याणकारी कामांसाठी होत असल्याने भाविकांमधूनही संस्थानच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे. हे योगदान म्हणजे ‘श्रद्धा आणि सबुरी’ सोबतच ‘सेवाभाव’ या साई तत्त्वाचीच प्रचिती असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *