सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे गोरक्षनाथ मदने यांचे आवाहन
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हा सदस्य नोंदणी अभियान व आढावा बैठक अहिल्यानगर येथे पार पडली. यावेळी संघटनेचे संचालक गोरक्षनाथ मदने, राज्य कोषाध्यक्ष गायत्री ढवळे, राज्य संयोजक गोरक्ष नेहे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख दक्षिण जिल्हाध्यक्ष गणेश कविटक्रर महिला विंग अध्यक्ष रोहिणी पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुक्याचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
व्हाईस ऑफ मीडियाचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवून संघटनेची बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले. अधिकृत सदस्य नोंदणीमुळे पत्रकारांना आरोग्य, शिक्षण, निवास, प्रशिक्षण आणि न्याय हक्कांसाठी संघटनेच्या पंचसूत्रीचा लाभ घेता येईल, तसेच लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यासह सर्वच तालुक्यातील कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी तालुकानिहाय संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी अभियानाचे कौतुक केले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच राज्य संयोजक गोरक्ष नेहे यांनी विभागीय केडर कॅम्प व बुलढाणा येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाबाबत माहिती दिली.
राज्य कोषाध्यक्ष गायत्री ढवळे यांनी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले यावेळी गायत्री ढवळे यांची राज्य कोषाध्यक्षपदी, तर गोरक्ष नेहे यांची राज्य संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल टाळ्याच्या गजरात अभिनंदन याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच अकोले तालुकाध्यक्षपदी नरेंद्र देशमुख यांच्या निवडीचेही स्वागत करण्यात आले.बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांनी केले, तर दक्षिण जिल्हा अध्यक्ष गणेश कविटकर यांनी आभार मानले. या आढावा बैठकीला अकोले, संगमनेर, राहुरी, पाथर्डी, नेवासा, कर्जत, पारनेर या तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.