{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांना दुष्काळी परिस्थितीची पशुपालकांना मदत करण्यासाठी व शासकीय योजना राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या की कोणताही पशु पालक शेतकरी शासकीय योजने पासून वंचित राहू तसेच शासकीय योजना सर्व पशुपालकांना लाभ मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला सूचना केल्या होत्या.

त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील व इतर तालुक्यातील तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पशुधनाची चारा व पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळकाळात पशुधनाला आवश्यक असणारा चारा, चारा बियाणे व ठोंबे वाटप, वैद्यकीय उपचार व इतर अनुषंगिक सेवांचा पुरवठा अचूकपणे व्हावा, यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी एनडीएलएम, अर्थात ‘भारत पशुधन प्रणाली’ वर अद्यावत करावी, तसेच नवीन पशुधनाचे टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन. अहिल्यानगर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका व
इतर तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संगोपन व संवर्धन करणे ही पशुसंवर्धन विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी आणि टॅगिंग ‘भारत पशुधन’ प्रणालीवर करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या डिजिटल नोंदीमुळे आपत्कालीन परिस्थितीत चारा बियाणे, ठोंबे व इतर मदत अचूकपणे व थेट पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचवणे आम्हाला शक्य होईल. सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ .दशरथ दिघे यांनी केले आहे.


पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, मदत कार्य व सवलतींचा लाभ थेट गरजू पशुपालकांच्या पशुधनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित पशुपालकांनी तात्काळ आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी व नवीन पशुधनाच्या कानात १२ अंकी बिला टोचन त्याबाबत नोंद भारत पशुधन प्रणालीवर करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *