{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

घुलेवाडी । झुंझार न्यूज

 


पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा वारसा जपत, घुलेवाडी येथील अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘वृक्षदिंडी’ मोठ्या उत्साहात साजरी केली. गुरुवार, दि. २३ जुलै आणि शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.

Oplus_131072

या वृक्षदिंडीमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी अमृतेश्वर मंदिर परिसरात सहभाग नोंदवला, तर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घुलेवाडी फाटा ते ग्रामदैवत मंदिरापर्यंत भव्य दिंडी काढली. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा ताल आणि वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकला होता. अनेक विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा साकारून दिंडीची शोभा वाढवली.

या प्रसंगी घुलेवाडीच्या सरपंच सौ. निर्मलाताई राऊत, सदस्य श्री. चंद्रकांत क्षीरसागर, युवा कार्यकर्ता ऋत्विक राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना खाऊचे वाटप केले.

हातात वृक्षसंवर्धनाचे फलक आणि कोणाच्या हाती छोटी रोपे अशा शिस्तबद्ध रीतीने निघालेल्या या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. महाराष्ट्राच्या वैभवशाली वारकरी परंपरेचे दर्शन घडवत असतानाच पर्यावरणाप्रति जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य या विद्यार्थ्यांनी केले.

या उपक्रमाचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, व्यवस्थापक-प्राचार्य श्री. व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडमिक श्री. जे. बी. गुरव, प्राचार्य श्री. आशिषकुमार तसेच सर्व विभागप्रमुखांनी विशेष कौतुक केले.

वृक्षदिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *