{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंजार न्यूज

2024 च्या लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून ऐन्य उन्हाळ्याच्या गरम वातावरणातच आरोप – प्रत्यरोपांनी राजकिय गरमाईला सुरुवात झाली असून शिर्डी लोकसभेकरिता महायुतीकडून गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चाचपणी सुरु करत कार्यकर्त्याना कामाला लावले मात्र रामदास आठवले यांना उमेदवारी न मिळाल्याने  रामदास आठवले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली त्यांचा रोख विखेकडे असल्याने विखेच्या ओठात एक , मनात एक हे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने नगर जिल्हयातील बौध्द समाज्यात नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे .

 

विखे पाटील यांनी आपल्या राजकिय व सहकार क्षेत्रातून जिल्हयात दबदबा निर्माण करत राज्यातील राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी सत्ता काबिज करण्यासाठी दोन करण्यास ते नेहमी सज्ज राहतात . निवडणुकीच्या आखाड्यात कधी कुणाला धूळ चारतील सागता येत नाही . सातत्याने जिल्हयाचे राजकारण आपल्या भोवतीच निर्माण करतान ते मागे पुढे पाहत नाही .2009 ला शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्याने रामदास आठवले यांना कॉग्रेस पक्षानी शिर्डीतुन उमेदवारी दिली मात्र आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांनी मतदारसंघ आघाडीत आदला – बदली व्हावी अशी इच्छा व्यक्त केली मात्र शरदराव पवार यांनी त्यांची मनोकामना पुरी होवून दिली नाही पवार – विखे च्या वादात मात्र आठवले यांच पराभव झाला . त्यावेळेस ” दगडापेक्षा विट मऊ ” हे वाक्य फिरले . पुर्वीची व आता परिस्थिती फार वेगळी असताना सुध्दा मोदी लाटेत विखेनी आपले वर्चस्व सिध्द करून दाखविले आहे .

 

केद्रींयमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाकडे शिर्डी , सोलापूर या दोन जागा मागितल्या त्यात शिर्डीतून ते स्वतः लढणार होते मात्र भविष्याचे राजकारण ओळखून शिर्डीतून प्रतिनिधी हा वरचढ नसावा हे धोरण विखेनी आखले त्यातून रामदास आठवले यांना उमेदवारी मिळाली नाही . काना मागून आले आणि तिखट झालेल्यांना सन्मानाने जागा मिळाल्याने साहजिकचं राज्यात बौध्द समाज्यात व रिपाई कार्यकर्त्यात नाराजी पसरली . त्यात शिर्डी व दक्षिणनगर रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यानी युतीचे काम न करण्याचे धोरण घेतल्याने दोन्ही उमेदवारासह राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेळाव्यातून , पत्रकार परिषदेतून नाराजी दूर करु असे बोलले गेले आहे . 

 

युतीकडून लोखंडे यांना तर आघाडीकडून वाकचौरे या आजी – माजी खासदारांना उमेदवारी जाहिर झाली मात्र अजून ही तळ्यात – मळ्यात चालू आहे दोन्ही उमेदवारांनी आपला वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार सुरु केला मात्र शिंदे गटाकडून बबन घोलप , नचिकेत खरात उमेदवारीच्या आशेवर आहे तर कॉग्रेस पक्षाला ही उमेदवारी मिळावी म्हणून उत्कर्षा रुपवते प्रयत्नात असून जर नाही मिळाली तर वंचितकडून निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहे . मात्र यातून विखे – थोरातांची डोके दुःखी वाढली असून रिपाईच्या नाराजीमुळे इकडे आड तिकडे विहीर अशी दुहेरी भुमिका विखेची दिसून येत आहे . नुकत्याचं झालेल्या रिपाईच्या विविध बैठकामधून लोणीकर आपलेल्या मान सन्मान देत नाही राजकिय सत्तेचा वाटा देत नाही म्हणून शिर्डी व दक्षिण नगर मधून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय कार्यकर्त्यानी घेतला असल्याचे दिसून येत असला तरी गुरुवारी होणाऱ्या रामदास आठवले यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्याची निवडणुकीच्या संदर्भात महत्वपुर्ण निर्णय होणार आहे .

 

चौकट 

शिर्डीची जागा आठवले यांना नाकारुन स्थानिक भाजपा नेत्यांनी मोठी खेळी केली असून यांची सल रिपाई कार्यकर्त्याच्या मनात रुजली असून आता माघार नाही शिर्डीतून , दक्षिणेतून स्वतंत्र उमेदवार देवून निवडणुक लढविण्यावर कार्यकर्ते ठाम असल्याचे दिसून येत आहे . ” आता आमचे ठरले ” हे ब्रिद वाक्य घेवून गावो गावी कार्यकर्ते एक्सन मुडमध्ये दिसणार आहे  

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *