आश्वी । झुंजार न्यूज

 

दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा आधार दिला या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील आश्वी बु।।, उबरी बाळापूर, ओझर येथे आयोजित बुथ सक्षमीकरण अभियाना अंतर्गत कार्यकर्त्यांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे,जेष्ठ कार्यकर्ते शालीग्राम होडगर, माजी उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, प्रवरा बँकेचे माजी प्रवरा बँकेचे माजी अध्यक्ष अशोकराव म्हसे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अॅड सौ. रोहिणीताई निघुते, सरुनाथ उंबरकर, भाऊपाटील गायकवाड, विनायक बालोटे विखे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, विविध योजनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाला जोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांमध्ये केले. तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी उमेदवार कोण आहे यापेक्षा देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे यासाठी काम करा. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख ठरल्या आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. या योजनेची माहिती पुस्तिका आपल्यापर्यंत दिली जाईल, योजना घराघरात पर्यंत पोहोचून येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करण्याचा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये तीन औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून पंधरा हजार युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे.जिल्ह्यात तालुका पातळीवर उद्योग निर्मित आणि कुशल कारागीर निर्मितीसाठी आय.टी.आय बरोबरच कौशल्य विकास केंद्रातून मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगून योजना हाच विकासाचा अंजठा घेऊ घराघरात जाण्याचे त्यांनी सुचित केले.

 

निवडणूक देशाची आहे त्याच्यामुळे आपले प्रश्न बाजूला ठेवा देशाला राष्ट्रीय नेतृत्वाची गरज आहे. नरेंद्र मोदी हे सक्षम उमेदवार असल्याचे सांगतानाच इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण याचे उतर अद्यापही देशाला मिळालेले नाही. केवळ पंतप्रधानांवर टिका करणे आणि राजकारण करणे, एवढेच विरोधी पक्षाचे काम सुरू आहे.

 

समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि पारदर्शक कारभारातून देशाला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याने ते विश्वनेता ठरले आहेत. भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देण्यासाठी विरोध विरोधी पक्ष कायमच एकवटलेले असतात. पारदर्शक कारभारासाठी आणि देश समृद्धीसाठी नरेंद्र मोदींना मतदान करा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *