शिर्डी । झुंजार न्यूज
२०२४ लोकसभेच्या उन्हाच्या कडाक्या बरोबर निवडणुकीचे हे वातावरण तापू लागले आहेत, ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. केद्रातील सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नमविण्याची रणनीती, संभाव्य अर्थात, तगड्या उमेदवारांची चाचपणी आणि पक्षातर्गंत वादाचे आव्हान मोडून भाजपा , कॉग्रेस , शिवसेना दोन गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन गट , रिपाई , वंचित , ओ बी सी बहुजन पार्टी आदीसह विविध पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे मात्र यात तरुणांना सह सुशिक्षितांनी ही उडी घेतल्याने या निवडणुकीत रंग येताना दिसत येत मात्र पुन्हा त्याचं त्या लोकांना संधी मिळत असल्याने शिर्डी मतदारसंघात बेरोजगारीसह अनेक समस्या उद्भवतान दिसत असल्याची खंत ओ बी सी बहजन उमेदवार अशोकराव अल्हाट यांनी व्यक्त केले .
शिर्डी लोकसभा मतदार संघातून संध्यातरी दोन शिवसेना गटातचं लढाई होण्याची चिन्हे दिसत होती मात्र अचानक माजी मंत्री प्रकाश आण्णा शेंडगे यांनी शिर्डीच्या सर्वांगीण विकासाकरिता ओ बी सी बहुजन पार्टी कडून जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांना उमेदवारी दिली धनगर , माळी , आदीवाशी , मागसवर्गीय समाज्याच्या आशिर्वादाने अल्हाट यांनी शिर्डीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत निवडणुकीच्या रिगणात उतरुन शिर्डीतून तिसरा पर्यांय उभा केला . गावो गावी – वाड्या – वस्त्यावर जात सर्व सामान्य , माळी , धनगर , आदीवाशी , ओ बी सी , मागसवर्गीय ‘ ठाकर समाज्यासह शेतकरी , बेरोजगार तरुणांना आशेयाचे किरण दाखवून तुम्हाला निस्क्रीय खासदार हवा की तुमच्या बरोबर राहून काम करणार खासदार हवाय असे आवाहन अशोकराव अल्हाट करत आहे .
जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अशोकराव आल्हाट, निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिर्डी लोकसभेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. इतर उमेदवारांची पार्श्वभूमी बघितली तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी वारंवार पक्ष बदलामुळे शिर्डी लोकसभेच्या जनतेमध्ये संभ्रह आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी मतदारसंघांमध्ये कमी आणि मुंबई जास्त असा त्यांचा खासदारकीचा प्रवास राहिलेला असून त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. रिपब्लिकन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना ही जागा महायुतीमधील शिंदे गटाला दिल्याने रामदास आठवले स्थानिक भाजपाच्या नाकर्तेमुळे ही जागा रिपाईला दिली गेली नसल्याने रिपाई कार्यकर्त्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे . या दोन्ही सेने गटाच्या उमेदवारांना सक्षम पर्याय म्हणून जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवत असून सर्वसामान्य गोरगरीब वंचित दीनदलीत यांच्यासाठी ते लढत असतात. सर्व समाजांमध्ये सर्व पार्टीच्या नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत शिर्डी लोकसभेमध्ये तुल्यबळ उमेदवार म्हणून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावू शकतात. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्याने एन्ट्री केलेले जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हट ओबीसी बहुजन पार्टी इतर छोटे-मोठे पक्ष सामाजिक संघटनांना सोबतीला घेऊन शिर्डी लोकसभेची बाजी पलटू शकतात अशी चर्चा शिर्डी लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहे .
यातून पुढील काळात शिर्डी मतदार संघाचा पुढील खासदार कोण याची उत्सुकता आणखीच शिगेला पोचली असल्याने या वेळेस नक्की परिवर्तनाची लाट दिसून येईल असा सूर लोकांना मधून निघत असून सर्वसामान्यांला संधी मिळणारचं असा विश्वास अल्हाट यांनी व्यक्त केला .गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी मतदार संघात अनेक समस्यामधून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे केवळ मोदीचा चेहरा पाहून जर निवडणुका होत असेल तर त्या मतदार संघाचा सर्वागीण विकास होणे ही महत्वाचे आहे मात्र तसे दिसले नाही काही ग्रामिण भागात खासदार कोण आहे हेचं माहित नाही . तर निवडणुकामधून तेचं ते चेहरे उमेदवारीकरिता चमकले जात आहे तेव्हा सर्वसामान्य , सुशिक्षीत व होतकरु लोकांना संधी कधी मिळणार हे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे .
