दीड वर्षानंतर तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये आनंद,


तळेगाव भागातील विविध नागरिकांकडून पाणी पूजन

संगमनेर । झुंझार न्यूज

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तळेगाव सह 16 गावांसाठी असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील दीड वर्षापासून बंद होती. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून निंबाळे शिवारातून प्रवरा नदीकाठी पंपिंग स्टेशन मधून वडगाव पान येथील साठवण तलाव्यात दीड वर्षानंतर पाणी दाखल झाल्याने लाभार्थी 16 गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडगाव पान साठवण तलाव येथे तळेगाव भागातील विविध कार्यकर्त्यांनी या पाण्याचे जल पूजन करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाणीपुरवठा समितीचे माजी अध्यक्ष प्रभाकर कांदळकर, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे , माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड,तिगाव सरपंच डी के सानप,वडझरीचे  डाॅ संदीप गोर्डे सचिन गोर्डे,  प्रकाश गोर्डे ,संजय दिघे
 वडझरी खु चे सरपंच पांडुरंग सुपेकर किशोर सुपेकर
 रामदास भागवत, बाळासाहेब दिघे माळेगाव सरपंच रावसाहेब जंबुकर सखाराम थोरात ,नानासाहेब कुळधरण, विलास थोरात सह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील दीड वर्षापासून  तांत्रिक अडचणी ,जलजीवन मिशनची कामे ,व इतर कारणांमुळे ही योजना पूर्णपणे बंद होती. कोल्हेवाडी परिसरातील काही विरोधी कार्यकर्त्यांनी मोठ्या अडचणी निर्माण केल्या होत्या. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तळेगाव भागामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांना व जनावरांचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध गावांमधून नागरिकांची पाण्यासाठी वन-वन होत आहे. मात्र प्रशासन आणि सध्याचे सत्ताधारी याबाबत अत्यंत उदासीन आहे.

म्हणून तळेगाव सह विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला .यापूर्वीही ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्या त्या वेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कारखान्याची यंत्रणा वापरून अगदी देवकवठ्याच्या टोकापर्यंत पाणी दिले हे सातत्य मागील 15 वर्षे कायम होते. अडचणी येत होत्या मात्र त्या सोडवल्या जायच्या.

मात्र सध्याचे सत्ताधारी हे पाण्याचेही राजकारण करत असून जनतेच्या लक्षात आल्यानंतर जनतेने पुन्हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने कोल्हेवाडी मधील अडचणी दुरुस्ती करत व वरिष्ठ पातळीवर बोलून सदर योजने कार्यान्वित करण्यासाठी लक्ष घातले.

यामुळे 17 महिन्यानंतर  हे पाणी तळेगावच्या साठवण तलावात दाखल झाले आहे. त्यामुळे तळेगाव तीगाव, करुले, निळवंडे, चिंचोली गुरव ,काकडवाडी, नान्नज दुमाला, वरझडी बुद्रुक, खुर्द , देवकवठे पारेगाव बुद्रुक यांच्यासह विविध गावांमध्ये योगी नियोजन केले तर हे पाणी मिळणार आहे.

हे पाणी साठवण तलावात आल्यानंतर कार्यकर्त्यांसह 16 गावांमधील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच योजना कार्यान्वित

16 गावांचा पाणी प्रश्न कायम सुटावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून अगदी प्रवरानदीवरून देव कवठ्याच्या टोकापर्यंत तळेगाव पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणी गेले. मात्र मागील दीड वर्षापासून नवीन लोकप्रतिनिधी व पालकमंत्री यांच्या उदासीनतेमुळे ही योजना पूर्णपणे बंद होती. अनेक वेळा विनंत्या केल्या, निवेदने दिली. महायुतीचे कार्यकर्ते मात्र पूर्णपणे गप्प होते. प्रशासनाला पाणी योजनेचे काही घेणे घेणे नव्हते .शेवटी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच 17 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या साठवण तलावात पाणी आले असल्याचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कांदळकर व युवक कार्यकर्ते सचिन दिघे यांनी म्हटले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *