संगमनेर । झुंझार न्यूज
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर शहरात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने के बी दादा सभागृहामध्ये शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता अभंग व भक्ती गीतांचा अभंग वाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आषाढी वारीचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोठे महत्त्व असून मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्व भाविक हा उत्सव साजरा करत असतात. या निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अवघा रंग एक झाला हा अभंग व भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता सह्याद्री महाविद्यालयाच्या के.बी.दादा सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.कांचनताई थोरात यांच्यासह संगमनेर मधील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ह.भ.प. विनोद राऊत सर व सौ.स्वप्नाली राऊत व त्यांचे चाळीस विद्यार्थी विविध अभंग सादर करणारा असून त्यांना सत्यजित सराफ, गणेश गोरडे, सौरभ रणधीर, वैभव पवार, अवधूत काळे, नानासाहेब गुंजाळ हे संगीत साथ देणार आहेत. तर संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

तरी या अभंग व भक्ती गीतांच्या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व भाविक भक्त युवक नागरिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय संगीत महाविद्यालय प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, प्रा. विनोद राऊत यांनी केले आहे.
