{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

 

संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या  निळवंडे – करुले विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी पोपटराव रामभाऊ पवार तर व्हा  चेअरमनपदी मुहम्मद  खुशुद्दीन पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.         
       

या निवडीबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी रामहरी कातोरे, मेजर महेंद्र  सोनवणे, मुंबई पोलीस सचिन सोनवणे, पीएसआय महेश बोऱ्हाडे, निळवंडे सोसायटीचे संचालक अशोक उकिर्डे, छायाताई शेटे , भाऊसाहेब वारे, ज्योती पवार ,रावसाहेब उकिर्डे  ,बाळासाहेब पवार, हरिभाऊ पवार ,सुभाष शिवनाथ पवार, सुभाष शिवराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
  
     

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदार यांचे हित जोपासत आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती केली आहे. व आता या सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी पोपटराव रामभाऊ पवार तर व्हा चेअरमन पदी मोहम्मद खुशुद्दीन पठाण यांची संचालक मंडळाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

     

या निवडकामी सहकार अधिकारी म्हणून राजेश जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव मोहन पवार यांनी काम पाहिले. यावेळी करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर, विकास पवार, प्रभाकर पवार, रामनाथ पवार,गोविंद उकिर्डे  , सा. का सुनील उकिर्डे ,  अशोक केरे, गंगाधर पवार , दत्तात्रय पवार , रायभान पवार , पोपटराव पवार, साहेबराव पवार ,माधव पवार, उत्तम माधव पवार ,उत्तम गणपत पवार, राजू गायकवाड ,भाऊसाहेब पवार ,सुदाम उकिरडे, अरुण पवार साहेबराव पवार, सिताराम पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.


     

या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे लोकनेते बाळासाहेब थोरात, मा डॉ.सुधीर तांबे, आ सत्यजित तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात एड. माधवराव कानवडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *