संगमनेर । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वाड्या – वस्त्या व गावो गावी फिरत असताना बेरोजगारी प्रश्नासह पाणी , दूध व शेती माला असणाऱ्या कमी भावामुळे तरुण व शेतकऱ्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असून लोकप्रतिनिधी हा केवळ मतदान मागण्याकरिता येतो त्यानंतर मात्र तो स्वतः हा व त्यांचा फोनचं नॉट रिचेबल असल्याचे लोकांच्या संवादातून कळू लागल्याचे संभाव्य उमेदवार नचिकेत खरात यांनी सांगितले .
संगमनेर येथील हॉटेल पंचवटी गौरव येथे झालेल्या वेग – वेगळ्या गावातून आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत नचिकेत खरात बोलत होते .
यावेळी बहुजन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री.विश्वनाथ अल्हाट  व श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचा सत्कार करण्यात आला तर सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री.संजयकुमार शिंदे सर व श्री.चंद्रकांत चव्हाण सर यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर phd प्राप्त करुन डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ.सचिन गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी नचिकेत खरात यांनी त्यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीचा चाचपणी करित असताना  सामाजिक कार्यकर्त्यांपुढे लोकसभा निवडणुक , लोकांमध्ये उद्भवणाऱ्यां समस्या , बेरोजगारी , पाणी , यांच्या गावो गावी फिरत असताना अजून ही काही लोकांना लोक प्रतिनिधी कोण आहे हेचं समजलेले नाही ही अत्यंत मनाला वेदना देणारी गोष्ट आहे . त्यामुळे आता या निवडणुकीतून तरुणांना संधी मिळावी म्हणून ही निवडणूक लढवणारच असा निश्चय व्यक्त केला. 
सदर कार्यक्रमाला प्रा.डॉ.भाऊसाहेब पवार,श्री.संतोष गायकवाड, श्री.लहाणू खरात, श्री.साळवे साहेब, सौ.मीनाक्षी खरात, सौ.जयश्री खरात, श्री.दौलत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *