शिर्डी । झुंजार न्यूज

गेल्या दोन अडीच वर्षापासून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यात अनैसर्गिक पध्दतीच्या घटना घडून घाणेरडे पद्धतीने राजकारण चालू आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून बहुमुल्य अशा मताचा अधिकार दिला असून या मताकरिता आदीवाशी समाज विकला घेतला जात असल्याचा गैरसमज असून माझा आदीवाशी विकत नाही तर हे आमदार खासदार खोक्याच्या माध्यमातून विकला जात असल्याचे आज चित्र निर्माण झाल्याची टिका एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केली .
oplus_2
शिर्डी येथील शांतीकमल हॉटेल मध्ये जिल्हा कार्यकर्ता संवाद या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते यावेळी संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदार संघातील आदीवाशी कार्यकर्ता वाड्या – वस्त्यावर जावून . १ लाख ८० हजार आदीवाशी लोकांना मतदान करण्याची जनजागृती करणार असल्याचे ठामपणाने एल्गार करण्यात आला . 
oplus_2
याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे , सचिन चौधरी , जगदीश चौधरी , दत्ता कडू , वाबळे , कोते , रोहीदास माळी ,एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास माळी , युवा जिल्हा राजेंद्र भालेराव , उपाध्यक्ष कुंदन माळी , जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष किरण माळी , महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पुनम माळी , सोशल मीडिया जिल्हा संपर्कप्रमुख नंदू बर्डे , एकलव्य संघटना संगमनेर तालुका अध्यक्ष अनिल बर्डे , नेवासा तालुका अध्यक्ष नानासाहेब बर्डे , श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष मोरे , राहता तालुका अध्यक्ष विलास मोरे , कोपरगाव तालुका अध्यक्ष उत्तम पवार , अकोला तालुका अध्यक्ष विजय पवार , संगमनेर पठार भाग प्रमुख भाऊसाहेब माळी ,  संगमनेर महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंदाताई पवार , एकलव्य संघटना महादेव कोळी तालुकाध्यक्ष दरेकर बाळकृष्ण संतोष बर्डे , कार्याध्यक्ष अनिल मोरे ,  गोरख बर्डे , विलास पवार ,आदीसह संगमनेर , कोपरगांव , अकोले , श्रीरामपूर , राहुरी , राहाता , नेवासा येथील आदीवाशी कार्यकर्ता उपस्थित होता .

शिवाजी ढवळे पुढे म्हणाले की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमुल्य असे संविधान दिले त्यामुळेचं आम्हाला सगळ्या गोष्टीचा अधिकार मिळाला . आम्ही स्वाभिमानी जगू शकतो . मात्र अठरा पगडीतील लोकांना पुन्हा गुलाम बनविण्याकरिता ४०० पारचा नार देवून संविधान बदलण्याचा खटाटोप असून देशाला हुकुमशाही च्या दिशेने घेवून जायचे धोरण असल्याचे दिसून येत आहे . मात्र लोक हुशार झाली आहे . त्यांना ही राजकारण समजू लागल्याने विकू लागलेल्या आमदार , खासदारांनाच आता घरचा रस्ता दाखवयाचा आहे . आणि होणारे घाणेरडे राजकारण थांबवयाचे आहे . आमची आदीवाशी चळवळ म्हणजे ही परिवर्तनाची व आत्मा सन्मानाची लढाई आहे आता संविधानाच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या हिताचे सरकार आले पाहिजेल या गंडूळ राजकारणाला अलविदा करा लोकांनी विचार केल्यास उमेदवार कोणी ही असो त्यांचा करेट कार्यक्रम होतो . मोदी सांगतात की आम्ही ८० टक्के लोकांना मोफत धान्य देतो यांचा अर्थ ८० टक्के गरिब आहे आहे मग विकास किती टक्के झाला हाच मुळात प्रश्नचिन्ह असून ही निवडणुकीचा शेवट होवून न देण्याकरिता विचारपुर्वक निर्णय घ्या .

तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की , आदीवाशी बाबत सरकारमध्ये उदासिनता येत असल्याने लोकांमध्ये चिड व्यक्त होत आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही संपविण्याचा कट आहे .आपला हक्क हिसकावून घेण्याचे धोरण करुन जाती – जमातीला पुन्हा पुर्वीचेचं दिवस आणून दयायचे आहे . मात्र आता लोक सुज्ञ झाली आहे . “आपला माणुस आपल्यासाठी ” या धोरणातून येणाऱ्या निवडणुकीच्या सामोरे जावून मशाल घरा – घरात पोहचवा व लोकांना यांचे महत्व सांगा . या निवडणुकीतून एका बाजूला धनशक्ती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे तर अनेक मार्गाने गोळा केलेला पैसा आता बाहेर निघणार आहे .
आदीवाशीचे अनेक प्रश्न आहेत त्याची अजूनही वाईट आवस्था असून त्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे . विविध असणाऱ्या सरकारी योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही त्या लाभापासून ते वंचित असल्याचे शेवटी सांगितले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *