संगमनेर । झुंजार न्यूज

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना जोडून सहकार चळवळ उभी केली त्या माध्यमातून त्या जुन्या कार्यकर्त्यांनी सुध्दा तळमळीने अविरात सहकार चळवळीत काम केल्यानेचं सहकार चळवळीतील संस्था पारदर्शक राहिल्याचे संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सागितले .

 

संगमनेर दूध संघाचे माजी चेअरमन लक्ष्मणराव कुटे यांच्या सत्कार प्रसंगी रणजितसिंह देशमुख बोलत होते . यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे आधिकारी चौधरी , माजी चेअरमन आर बी रहाणे , संचालक  विक्रमराजे थोरात , विलास कवडे , रविंद्र रोहम , संतोष मांडेकर , फायनान्स मॅनेजर शिंदे , सुभाष पाटील गुजांळ तसेच आंभोरे येथील पदाधीकारी व  सघांचे कार्यकारी अधिकारी डॉ सुजित खिलारी यांच्यासह दूध संघाचे संचालक , आधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

 

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की , सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी गावो गावी कार्यकर्त्यांना सहकारी संस्था उभ्या करून सहकार चळवळीच्या प्रवाहात आणले कार्यकर्त्यानी सुध्दा प्रामाणिक व एकनिष्ठेने काम करत संस्था उभ्या केल्या त्यातून शेतकऱ्यांना व सर्वसामान्य माणसांना आर्थिक फायदा झाला . जुने कार्यकर्ते हे दादाचे अत्यंत विश्वासू ठरले संगमनेर तालुक्यातील सहकारातील संस्थांच्य जडण – घडणीत जुन्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे देशमुख यांनी सांगितले तर १९७० पासून लक्ष्मणराव कुटे यांनी सहकार व राजकिय प्रवासात दादाना मोलाची साथ दिली .

यावेळी सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण कुटे म्हणाले की , १९७० ला माझी व भाऊसाहेब थोरात यांची भेट त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रभावीत होवून राजकिय व सहकार चळवळीत कामास सुरुवात केली . १९७२च्या दुष्काळी प्रसंगी २०० एकरकरिता पाईप लाईन केली यात थोरातांचे मोठे सहकार्य लाभले या पाईप लाईनीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला . पुढे १९७४ ला मार्केट कमिटीवर११ वर्ष काम करण्याची संधी मिळाली , जि प निवडणुका झाल्या अंभोरे गटातून निवडणुक लढविली मात्र माझ्यासह यात सहकाऱ्यांसह पराभव झाला . पुढे शम्प्रोची स्थापना झाली त्यात चेअरमन म्हणून ३ वर्ष काम बघितले त्यामाध्यमातून तालुक्यात पाईप लाईनचे जाळे विणले , कारखान्यावर २० वर्ष , दूध संघावर २० , थोरात पिता – पुत्रानी विश्वास ठेवून काम करण्याची संधी मिळाली .

oplus_2

आभार विलास कवडे  

चौकट 
कोल्हापूर येथील गोकूळ जिल्हा दूध संघ हा रोज १८ लाख लिटर दूध संकलित करत असून मुंबई विभागात सर्वात जास्त दूध वितरित होत आहे तर संगमनेर दूध संघातील निर्माण होत असलेल्या ‘ चीज ‘ला मार्केट मध्ये मोठी मागणी आहे याचं पार्श्वभूमीवर गोकूळ दूध संघाचे आधिकाऱ्यांनी दूध संघाला भेट दिली .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *