संगमनेर । झुंजार न्यूज

 

यावर्षी राज्यात सर्व दूर सरासरीपेक्षा जास्त उष्णतामान होते. वाढलेली उष्णता ही सजीव सृष्टीसाठी हानिकारक असून ग्लोबल वार्मिंग च्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येकाने वृक्षारोपण व संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले असून पर्यावरण दिनानिमित्त थोरात कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले .

 

 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारती जवळ वृक्षारोपन करण्यात आले.

 

 यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,शंकर पा.खेमनर, सुधाकर जोशी, आर.एम.कातोरे,संतोष हासे, संपतराव गोडगे, सौ.अर्चनाताई बालोडे, सुनंदाताई जोर्वेकर, चंद्रकांत कडलग,राजेंद्र गुंजाळ,हौशीराम सोनवणे,सुभाष सांगळे,बाळासाहेब गायकवाड,रमेश गुंजाळ,विनोद हासे,मिनानाथ वर्पे, अनिल काळे,संभाजी वाकचौरे,मानिक यादव,रोहिदास पवार,कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,दुध संघाचे कार्यकारी संचालक .सुजित खिलारी, किरण कानवडे, बाळासाहेब सावंत,बाळासाहेब फापाळे यांच्या उपस्थित झाडांचे रोपण करण्यात आले.

 

यावेळी डॉ.तांबे म्हणाले कि, वृक्षारोपन व संवर्धन हे मानवाची व सजिवसृष्टीची मोठी गरज आहे. मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात व जिल्ह्यात पर्यावरण जाणीव जागृती वाढली असून दंडकारण्यातून उभे होत असलेले काम मोठे आहे. जागतीक पर्यावरणाचा धोका वाढला असून यावर वृक्ष लागवड हाच उपाय आहे. वाढते तापमान,कमी पर्जन्यमान यामुळे दुष्काळासारख्या समस्या निर्माण होवु लागल्या आहे.अमृत उद्योग समुहातील व तालुक्यातील विविध संस्था,विद्यालये यांनी सक्रीय सहभाग घेत वृक्ष रोपन व संवर्धन केले. यामुळे दंडकारण्य अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप मिळाले आहे. या अभियानामुळे वृक्षलागवडीची संस्कृती वाढली असून स्व.भाऊसाहेबांनी दुरदृष्टी ठेवून सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानातून भावी पिढी सुखी होणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

 

यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगात ज्या विषयावर चिंता व्यक्त केली जात आहे. तो म्हणजे पर्यावरण,पर्यावरणाचे संरक्षण झाल्याशिवाय मानव सुरक्षित व सुखी होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील युवक,ग्रामस्थांनी पर्यावरणाचे काम जनआंदोलन चळवळ म्हणून उभे केले पाहिजे. स्व.भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे.

 

बाबा ओहोळ म्हणाले की,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दादांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही चळवळ सतत चालू राहीली पाहिजे.लोक सहभाग वाढला पाहिजे. भविष्य कालीन पिढी सुखात राहण्यासाठी सर्वांनी या चळवळीत सहभागी झाले पाहिजे.

 

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *