{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जय हनुमान भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या यांच्या वतीने हा धार्मिक उत्सव साजरा केला जाणार आहे.

मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ ते मंगळवार २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असून, यादरम्यान नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.


सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत काकडा भजन, सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे.

या सप्ताहात १८ ऑगस्ट (मंगळवार): ह.भ.प. तुकाराम महाराज घुगे (निफाड) ,१९ ऑगस्ट (बुधवार): ह.भ.प. महंत मधुसुदन गिरीजी महाराज (श्री सोमेश्वर संस्थान, शिही) , २० ऑगस्ट (गुरुवार): ह.भ.प. अनिल महाराज कडलग (पोखरी हवेली) ,२१ ऑगस्ट (शुक्रवार): ह.भ.प. कल्याणजी महाराज पवार (माऊली आश्रम, संगमनेर) ,२२ ऑगस्ट (शनिवार): ह.भ.प. महेश महाराज शास्त्री (संत तुकाराम आश्रम, कवळ) ,२३ ऑगस्ट (रविवार): ह.भ.प. महंत दत्तगिरीजी महाराज (रामेश्वर ट्रस्ट, वरवंडी),२४ ऑगस्ट (सोमवार): ह.भ.प. हरीशरणगिरीजी महाराज (ओराम दरबार आश्रम तिर्थ, बाजाठाण), तर सप्ताहाची सांगता मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. नितीन महाराज गोडसे (संस्थापक, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था, कोतुळ) यांच्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ होईल.

सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून तो संपूर्ण गावाचा एक सामाजिक उत्सव असतो. या निमित्ताने गावातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येतात. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज अन्नदानाची (महाप्रसाद) सोय करण्यात आली आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *