{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 कोपरगांव l झुंजार न्यूज

कोपरगांव तालुक्यातील देर्डे को-हाळे येथील डॉ. अनुराधा नेमिनाथ म्हस्के यांच्या प्रदिर्घ ५४ वर्षीय वैद्यकिय सेवेबद्दल  छत्रपती संभाजीनगर येथील मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजने नुकताच सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते  मानपत्र देवुन  सन्मान केला आहे.
     
         
डॉ. अनुराधा नेमीनाथ म्हस्के यांनी जे जे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट नर्सिंग एज्युकेशन मुंबई येथे लेक्चरर पदापासून विविध पदावर काम करत त्या प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. शासनाच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांची  ३८ वर्ष सेवा झाली. त्यांचे पती नेमिनाथ  म्हस्के हे बॉम्बे हॉस्पीटल येथे सिनीयर टेक्नीकल ऑफिसर या पदावर ३६ वर्षे कार्यरत होते . डॉ. अनुराधा  म्हस्के  या सेवा कालखंडात त्या छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य झाल्या त्यानंतर नर्सिंग डायरेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत याशिवाय त्यांनी नर्सिंग मध्ये पीएचडी पुर्ण करत डॉक्टरेट मिळविली आहे. सध्या त्या पी एच डी चे गाईड म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या प्रदिर्घ वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा व एमजीएम व्यवस्थापनात १६ वर्षे ३ महिने काम केल्याचा गौरव म्हणून मदर तेरेसा नर्सिंग महाविद्यालयांने गौरव करत एम जी एम व्यवस्थापनांने त्यांचा मानपत्र देऊन  सन्मान केला आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. गौरव म्हस्के यांनी देखील न्युझिलंडच्या ऑकलंड विद्यापीठातुन पब्लीक हेल्थवर उच्च शिक्षण घेवुन सध्या त्यांचे मुंबई येथे काम सुरू आहे. 
       
     
डॉ अनुराधा यांचे पती नेमीनाथ म्हस्के यांनी ग्रामिण भागात राहुन वैद्यकिय क्षेत्रात करीयर करण्यांसाठी पत्नीला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 
     
       
डॉ. अनुराधा म्हस्के यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले व देर्डे को-हाळे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed