आश्वी | झुंजार न्यूज
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघांमध्ये गेली तीन टर्म एका विशिष्ट समाजाला उमेदवारी दिली जाते मात्र बौद्ध समाजाची ख्रिश्चन समाजाची 50 हजार लोकसंख्या असूनही बौद्ध समाजाला जाणून-बुजून डावलत असून इथले प्रस्थापित त्यामुळे आपण निरीक्षक म्हणून बौद्ध समाजाच्या उमेदवाराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मागणी बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने डॉ राजू वाघमारे यांची श्रीरामपूर शासकीय विश्रामगृह येथे बौद्ध समाजाचे शिष्टमंडळ भेट घेत केली .

भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर आरपीआय आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन जिल्हा सिविल हॉस्पिटल चे सेवानिवृत्त सिविल सर्जन डॉक्टर वसंत केरू जमधडे मुस्लिम समाजाचे रसिक इनामदार आधी प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉ राजू वाघमारे यांच्याकडे मागणी केली असून हा शेवटचा टर्म असल्याने बौद्ध समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये येथील प्रस्थापित राज्यकर्त्यावर नाराज असून मात्र महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे या मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा बौद्ध समाजाच्या नागरिकांनी डॉ राजीव वाघमारे यांच्याकडे खंत व्यक्त करत बौद्ध समाजाला उमेदवारी दिली तर येथील शिवसेना पक्षाचा व महायुतीचा उमेदवार हा 40 हजाराच्या पुढच्या फरकाने निवडून येईल जर येथील उमेदवारी चुकली तर येथील उमेदवार पडणार असल्याची माहिती बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळात दिली येथील प्रस्थापित राज्यकर्ते उभे करण्यासाठी श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाचा फार मोठा वाटा असून जी नेते श्रीरामपूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजाच्या जीवावर मोठी झाली ते बौद्ध समाजाला विसरून गेली असून त्यांनी आता बौद्ध समाजाच्या बाजूने उभे राहावे कारण पुढील पंचवार्षिकला हा मतदारसंघ आरक्षित राहणार नसून त्यांना पुढील काळामध्ये बौद्ध समाजाची मोठी गरज पडणार आहे त्यामुळे त्यांनी यावेळेस बौद्ध समाजाकडे सक्षम असे दोन-तीन उमेदवार असून त्यांना उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकतात असे उमेदवार बौद्ध समाजामध्ये असून त्यांचा प्रामुख्याने विचार करावा असे मागणी बौद्ध समाजाच्या वतीने शिवसेना पक्षाचे सह प्रवक्ते महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना उपनेते डॉ राजीव वाघमारे यांच्याकडे केली आहे

यावेळी शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती विभागाची बैठक आयोजित केली होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब पगारे , जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे , जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक खरात , श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रतापूर पप्पू पवार भागीरथ रणदिवे , डॉ रवी मुन्तोडे , राहाता तालुका उपप्रमुख जॉन पाळंदे , सचिव सुनील बनसोडे , संगमनेर तालुका उपप्रमुख ॲड रमेश बनसोडे , गौतम रोहम आदी प्रमुख मान्यवर सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते

यावेळी डॉ राजू वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील काही मान्यवरांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट बहुजन समाज पक्षाचे बाळासाहेब भोसले प्रकाश निंबाजी खरात रशीद भाई इनामदार रिपाई गवई गटाचे पप्पू पवार आदी प्रमुख मान्यवरांनी शिवसेना उपनेते सहप्रवक्ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ राजीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला असून येत्या काही दिवसांमध्ये भव्य मेळावा घेणारा असून शिरापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो युवकांचा इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होणारा असून येत्या पंधरा दिवसांमध्ये भव्य शेतकरी मेळावा तसेच महिला आघाडी मेळावा बेरोजगार मेळावा घेणार असल्याची माहिती अनुसूचित जाती विभागाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे यांनी दिले आहे यावेळी आभार श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब भालेराव यांनी मांडले

