संगमनेर l झुंजार न्यूज

खराडी येथे दत्त व वेडूवाई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, रामदास पाटील वाघ, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे ,वसंतराव साबळे, लहानभाऊ पा.गुंजाळ, रामहरी कातोरे, ॲड नानासाहेब शिंदे,संतोष हासे ,नवनाथ आरगडे, बाळासाहेब शिंदे, पुनमताई माळी, आर.बी राहणे,सौ मंदाताई वाघ, सरपंच सौ ज्योतीताई पवार, उपसरपंच राजेंद्र कोटकर, प्रीतम साबळे ,लक्ष्मण वाघ, आदींसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवीन पाण्याच्या टाकीचे पूजनही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सततच्या विकास कामामुळे संगमनेर तालुका हा राज्यात सर्वात चांगला तालुका म्हणून ओळखला जातो. सहकार, शिक्षण, राजकारण शेती यामुळे संगमनेरची राज्यात लौकिकास्पद तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे.



तर मा.आमदार डॉ तांबे म्हणाले की, राज्य सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांनी या योजना अगोदर का आणल्या नाहीत .फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना आणल्या आहेत .मागील अडीच वर्षे महागाई वाढवली. हे पैसे जनतेचे पैसे आहेत. सध्या राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज या सरकारने केले आहे . या सरकारला खाली खेचा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सौ दुर्गाताई तांबे,रणजीत सिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, रामदास पाटील वाघ यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला पैलवान गणपत खेमनर, नानासाहेब गुंजाळ, कैलास पानसरे ,अशोक साबळे, भाऊराव वाघ ,आबासाहेब चत्तर ,विलास मोरे, लक्ष्मण साबळे, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच सौ ज्योती पवार यांनी केले प्रास्ताविक वसंतराव साबळे यांनी केले तर लक्ष्मण वाघ यांनी आभार मानले.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह मान्यवरांची पारंपारिक वाद्यांमध्ये गावकऱ्यांनी भव्य दिव्य मिरवणूक काढली. या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
