पेमगिरीच्या शहागडावर हिंदवी स्वराज्य संकल्प दिन उत्साहात

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

पेमगिरीच्या शहागडाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा इतिहास केवळ पेमगिरी किंवा संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मध्ये पोहोचविण्याची गरज आहे. शहागडाच्या विकासाचा ध्यास आ अमोल खताळ यांनी घेतला असून त्यासाठी पेमगिरीकरांनी आपल्या गावातील राजकारण, गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीलम खताळ यांनी केले.


संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर हिंदवी स्वराज्य संकल्प दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर यावेळी कोल्हापूर येथील शिवचरित्रकार डॉ संदीप महिंद किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड किरण झिंजुरके चंदनपुरी चे माजी सरपंच प्रमोद राहणे श्रीक्षेत्र वढू येथील सौ अंजली देशमुख सौ वर्षा डुबे यांच्यासह पेमगिरी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते , ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ खताळ म्हणाल्या, शहागडाच्या विकासासाठी आ. खताळ कोणत्या ही परिस्थितीत मागे हटणार नाहीत. मात्र, या विकासकामांना गती देण्या साठी पेमगिरीकरांनी एकजुटीची ताकद दाखविणे गरजेचे आहे. शहागडावर तीन दिवसांचा हिंदवी स्वराज्य संकल्प दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पर्यटन विभागाची परवानगी मिळाली आहे. नवरात्रोत्सवापर्यंत आ खताळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम निश्चितपणे राबविला जाईल.शहागडाच्या विकास कामांना सुरुवात झाली असून,या गडाच्या भिंती उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. शहागडाचा विकास पूर्ण झाल्यानंतर येथे पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल. त्यामुळे पेमगिरीच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल,असा विश्वासही सौ नीलम खताळ यांनी व्यक्त केला.

शहाजीराजे भोसले यांनी वेरूळ येथून सुमारे २०० ते २५० किलो मीटरचा प्रवास करून पेमगिरीच्या शहागडावर येत स्वराज्याचा संकल्प केला होता. हा इतिहास केवळ पेमगिरी किंवा संगमनेर तालुक्या पुरता मर्यादित न ठेवता तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पेमगिरी येथील शहागडाचा इतिहास महाराष्ट्र भर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पुढील वर्षी शहाजीराजांची केवळ प्रतिमा न ठेवता त्यांची मूर्ती तयार करून पालखीतून शहागडावर आणावी.

 

डॉ. संदीप महिंद,
ज्येष्ठ व्याख्याते, कोल्हापूर
…………………………………………………….

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *