जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेकाठी शाळेतील विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिती कारभारी खालकर-उकिर्डे यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) वतीने दिला जाणारा मानाचा आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ जाहीर झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ या उपक्रमासाठी प्राथमिक शाळा झरेकाठी येथील आदर्श शिक्षिका श्रीमती खालकर-उकिर्डे यांची निवड झाली आहे.
झरेकाठी शाळेत विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची या निवडीच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
शाळेत विविधांगी उपक्रम राबवत केलेले त्यांचे कार्य खरोखरच नावलौकिक वाढविणारे आहे.
या गौरवशाली यशाबद्दल प्रीती खालकर यांचे गटविकास अधिकारी श्री पी .ए.सिनारे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब गुंड , शिक्षण विस्तार अधिकारी श्री के .पी. भागवत , केंद्रप्रमुख श्री विश्वनाथ खिलारी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे, शितल डोळे यांनी व, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.