{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 नकुल कडू यांच्या सतर्कतेमुळे मजूर बचावले

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहता तालुक्यातील तिसगाव-लोहेगाव शिवरस्त्यावर आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दिनांक ०२/११/२०२६ रोजी सायंकाळी ७,15 मिनिटांन वाजण्याच्या सुमारास तिसगाव-लोहेगाव शिवरस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील एका विहिरीवर बिबट्या बसलेला असल्याचे तिसगाव येथील श्री. नकुल विलासराव कडू (संचालक, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, NCUI नवी दिल्ली) यांनी पाहिले.

त्याच वेळी शेतात दिवसभर काम करून अनेक मजूर, कामगार व शेतकरी घराकडे परतत होते. बिबट्या अगदी जवळच असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र श्री. कडू यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरडा करून मजुरांना सावध केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे सर्व मजूर व शेतकरी बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात बचावले आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा दुर्घटना घडली नाही.

दरम्यान, या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी श्री. नकुल विलासराव कडू यांनी वन विभागाकडे केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *