{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज संगमनेर येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. याच अनुषंगाने बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मतदान केले.

यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार गणपत सांगळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *